September 7, 2024 2:07 PM

उत्तर प्रदेशात बस अपघातात १२ जणांचा मृत्यू,

उत्तर प्रदेशात, हातरस जिल्ह्यात काल एक वाहन आणि राज्य परिवहनाची बस यांच्यात झालेल्या धडकेत चार मुलांसह किमान 12 जण ठार झाले. या अपघातात अन्य 16 जण जखमी झाले आहेत. आकाशवाणी न्यूजशी बोलताना हातरसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं की, राष्ट्रीय महामार्ग-93 वर चांदपा पोलीस स्थानक हद्दीतील मीताई गावाजवळ ही दुर्घटना घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातरस रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.  

July 3, 2024 1:38 PM

उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये संत्संगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातल्या फुलराई गावात सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीमुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. २८ जण  गंभीर जखमी असून त्यांच्यावर आगरा, अलिगढ आणि हाथरसमध्ये विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच हाथरस जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी हा सत्संग आयोजित करणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक बाबाच्या शोधासाठी मैनपुरी जिल...

June 20, 2024 12:23 PM

उत्तर प्रदेशमध्ये लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार

उत्तर प्रदेशमध्ये महाराजगंज इथं आशियाई किंग गिधाड किंवा लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे 2007 पासून आंतरराष्ट्रीय निसर्गं संवर्धन संघटेच्या लाल यादीत सूचीबद्ध गंभीरपणे धोक्यात असलेल्या या प्रजातींची संख्या सुधारेल. या केंद्राचे नाव जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र असं ठेवण्यात आलं आहे.आशियाई किंग गिधाडांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे आणि पाळीव प्राण्यांमध्ये डायक्लोफेनाक, या दाहविरोधी औषधाचा अतिरेकी वापर, गिधाडांसाठी विषारी बन...