July 1, 2024 1:16 PM

ज्ञानोबा – तुकोबांच्या पालख्या पुण्यात दाखल

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दोन दिवसांच्या मुक्कमासाठी काल पुण्यात दाखल झाल्या. दोन्ही पालख्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या पाटील इस्टेट चौकात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यात परळी इथं आगमन झालं. पालखीचं भाविकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केलं. पैठणहून निघालेली संत श्री एकनाथ महाराजांची पालखी काल अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली. आज मिडसावंगी इथं पालखीचा पहिला रि...

June 14, 2024 7:50 PM

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सर्व आवश्यक सोयी सुविधा देण्याचे राज्य सरकारचे प्रशासनाला आदेश

    आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याकरता पंढरपूर पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित विभागांना दिले. ते पुणे इथल्या विधान भवनात झालेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते. इंद्रायणी नदी स्वच्छतेचं काम तातडीनं करावं, पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करावं, मानाच्या पालख्यांसह इत...