June 27, 2024 7:15 PM

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची गतविजेत्या इंग्लंडशी लढत

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. गयाना इथल्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर रात्री आठ वाजता हा सामना सुरु होईल. आज झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत जाण्याची दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच वेळ आहे.

June 20, 2024 8:30 AM

टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा अफगाणिस्तानसोबत सामना

टी - ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत होणार आहे. बार्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. या स्पर्धेत सध्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरु आहे. दरम्यान, काल झालेल्या सुपर एट मधल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अमेरिकेचा १८ धावांनी पराभव केला.