July 2, 2024 7:51 PM

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक

महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबई विमानतळावर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक केली. हा प्रवासी बँकाॅकहून मुंबईला आला होता. या प्रवाशाकडे ५ कोटी रुपये किंमतीचे गांजा सदृश अंमली पदार्थ सापडले. या प्रवाशावर अंमली पदार्थ प्रतिंबधीत कायद्याखाली गुन्हा दाखल केल्याचं संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

June 14, 2024 8:21 PM

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणार रॅकेट अटकेत

नवी दिल्लीतल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणार रॅकेट पकडलं असून त्यांच्याकडून २० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केली. याप्रकरणातील दोन मुख्य सुत्रधारांना अटक केली असून त्यातील एक नायजेरियाचा तर दुसरा आयवरी कोस्टचा असल्याचं विशेष पथकानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं. या दोघांकडून सुमारे सहा किलो मेथमफेटामाइन हा अंमली पदार्थ जप्त केल्याचंही पत्रकात नमूद केलं आहे. हे दोघेही बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य करत असल्याचं तपासातून पुढं आलं असू...