August 27, 2024 7:34 PM

printer

राज्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी आज जोरदार तर तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. पुढल्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मराठवाड्यातल्या तुरळक ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.