खेळ

August 26, 2024 8:47 PM

सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारताचा बांगलादेशाकडून पराभव

दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघानं आयोजित केलेल्या वीस वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत आज भारतीय संघाला बांगलादेशाकडून पराभव पत्करावा लागला. नेपाळमधे काठमांडू इथं या स्पर्धेचा अंतिम सामना झाला.  हा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानं बांगलादेशानं पेनल्टी शूटआऊटच्या बळावर ४-३ अशी मात करून स्पर्धेचं विजेतेपद पटका...

August 26, 2024 8:09 PM

आशियाई सर्फिंग सांघिक स्पर्धेत भारताला रौप्य पदक

मालदीवच्या थुलुसधू इथं झालेल्या आशियाई सर्फिंग २०२४ स्पर्धेत सांघिक प्रकारात भारतानं आज रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून जपान ५८ पूर्णांक ४० गुणांसह प्रथम स्थानी आहे, तर भारत २४ पूर्णांक १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.  तैपेई २३ पूर्णांक ९३ गुणांसह तिसऱ्या, तर  चीन २२ पूर्णांक १०  गु...

August 26, 2024 1:08 PM

आशिया सर्फिंग अजिंक्यपद स्पर्धेतल्या मारुहाबा चषक स्पर्धेत भारताची रौप्य पदकाला गवसणी

मालदीवच्या थुलुसधू इथं झालेल्या आशियाई सर्फिंग अजिंक्यपद  २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारुहाबा कप या सांघिक स्पर्धेत भारतानं आज रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत  सुवर्ण पदक जिंकून जपान ५८ पूर्णांक ४० गुणांसह प्रथम स्थानी आहे, तर भारत २४ पूर्णांक १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.  तैपेई २३ पूर्णांक ९३ ग...

August 26, 2024 1:36 PM

न्यूयॉर्कमध्ये आजपासून अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

वर्षातली शेवटची टेनिस ग्रँडस्लॅम यूएस खुली अजिंक्यपद स्पर्धा आजपासून न्यूयॉर्कमध्ये सुरू होणार आहे. भारताचा सुमित नागल आणि रोहन बोपण्णा हे दोघे स्पर्धेत उतरतील. एकाच वर्षात चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या एकेरीत खेळणारा सुमीत नागल २०१९ नंतरचा पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू ठरला आहे. सध्या तो जागतिक क्रमव...

August 25, 2024 1:37 PM

भारताच्या तन्वी पात्रीनं १५ वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीचं विजेतेपद पटकावलं

चीनमध्ये चेंगडूू इथं सुरू असलेल्या आशिया १७ आणि १५ खालील कनिष्ठ गट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी पात्रीनं १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. तन्वीने अंतिम लढतीत व्हिएतनामच्या गुयेन थि थू ह्युगेनचा २२-२०, २१-११ असा पराभव केला.   १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत, ...

August 24, 2024 8:07 PM

भारताच्या किशोर कुमारची तराफा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

भारताच्या किशोर कुमारनं आज तराफा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानं येत्या २०२६ आशियाई स्पर्धांमध्ये भारताचा प्रथमच तराफा खेळासाठी प्रवेश निश्चित झाला आहे. जपानच्या ऐची-नागोया इथं ही स्पर्धा होणार आहे. किशोर कुमारनं आशियाई सर्फिंग अजिंक्यपद २०२४ स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात उपांत्य फेरीत अत्यंत चांग...

August 24, 2024 2:14 PM

भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती

भारतीय क्रिकेटपटू शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून तसंच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या एका चित्रफितीद्वारे धवनने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल शिखर धवनने कृतज्ञता व्यक्त केली. ...

August 23, 2024 1:34 PM

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमीत नागलची लढत नेदरलँड्सच्या टॅलन ग्रीक्सपूर याच्याशी होणार

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताच्या सुमीत नागलची लढत येत्या सोमवारी नेदरलँड्सच्या टॅलन ग्रीक्सपूर याच्याशी होणार आहे. यूएस ओपनच्या जुलै महिन्यात झालेल्या मुख्य ड्रॉ मध्ये सुमीतनं स्थान मिळवलं. जागतिक क्रमवारीत सुमीत ७२ व्या क्रमांकावर आहे.   दरम्यान, यूएस ओपनमध्ये २४ वेळा ग...

August 23, 2024 1:12 PM

भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर

भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढच्यावर्षी जूनमध्ये इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने लीड्स, बर्मिंहम,लंडन, आणि मॅनचेस्टर इथं खेळले जाणार आहेत.    भारतीय महिला क्रिकेट संघ...

August 23, 2024 10:06 AM

लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर

भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. नीरजने ८९ पूर्णांक ४९ मीटर अंतरावर भालाफेक करत या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.   [video width="644" height="360" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/u...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.