खेळ

July 9, 2024 2:25 PM

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताच्या पथकाचं नेतृत्व गगन नारंगकडे

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताच्या पथकाचं नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंग करणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं नारंग याची निवड शेफ डी मिशन (सीडीएम) म्हणून केली आहे. यापूर्वी मुष्टियोद्धा मेरी कोम या पथकाचं नेतृत्व करत होत्या. मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर या पथकाचं ने...

July 9, 2024 10:45 AM

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी नेमबाज गगन नारंग यांची पथकाचे प्रमुख म्हणून निवड

 भारतीय ऑलिंपिक संघटनेनं पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी नेमबाज गगन नारंग यांची पथकाचे प्रमुख म्हणून निवड केली आहे. २६ तारखेपासून या स्पर्धा सुरू होणार आहेत. मेरी कोम यांची या आधी पथकप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे असमर्थता व्यक्त केल्यामुळे आधी उपपथकप्रमुख म्हणून न...

July 8, 2024 1:10 PM

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : कार्लोस अल्काराज आणि जेनिक सिनर यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत गतविजेता कार्लोस अल्काराज आणि अव्वल मानांकित जेनिक सिनर यांनी काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.     अल्काराझने  फ्रान्सच्या उगो हम्बर्ट याचा ६-३, ६-४, १-६, ७-५ असा पराभव केला. तर सिनरने अमेरिकन खेळाडू बेन शेल्टन याला ६-२,६-४,७-६(९) असं नमवलं.    सात वेळा विजेतेपद...

July 8, 2024 1:11 PM

पॅरिस डायमंड लीगमध्ये स्टीपलचेस प्रकारात भारताच्या अविनाश साबळेचा नवा राष्ट्रीय विक्रम

पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेला भारतीय धावपटू अविनाश साबळे यानं काल डायमंड लीग स्पर्धेत पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. पॅरिसच्या चार्लेटी मैदानावर झालेल्या स्पर्धेत अविनाशने ८ मिनिटं , ९ सेकंद आणि ९१ मायक्रोसेकंदां मध्ये अंतर पार करत नवा विक्रम प्रस्थापित क...

July 8, 2024 10:58 AM

महिला क्रिकेट : भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवरचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तत्पूर्वी, फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावत 177 धावा केल्या होत्या. तझमिन ब्रिट्सने सर्वाधिक 52 धावा 39 चेंडूत केल्या, तर एनेक बॉशने 32 चेंड...

July 7, 2024 8:33 PM

झिम्बाव्वे विरोधातल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा १०० धावांनी विजय

भारत आणि झिम्बाव्वे यांच्यात आज झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं १०० धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, अभिषेक शर्मा यानं झळकावलेल्या पहिल्या शतकाच्या जोरावर भारतानं, झिम्बाव्वे समोर विजयासाठी २३५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र १९व...

July 7, 2024 7:23 PM

बिलियर्ड्स : भारताच्या ध्रुव सितवालाने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं

बिलियर्ड्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद भारताच्या ध्रुव सितवाला यानं आपल्या नावावर केलं आहे. अंतिम सामन्यात त्यानं भारतात्याच पंकज अडवाणीवर ५-२ अशी मात केली. या पराभवामुळे या स्पर्धेचं जेतेपद सलग तिसऱ्यांदा मिळवण्याची पंकज अडवाणीची संधी हुकली आहे.

July 7, 2024 7:14 PM

आशियाई दुहेरी स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा : भारताच्या अभय सिंहची पुरुष आणि मिश्र दुहेरी दोन्ही प्रकारांमध्ये अजिंक्यपदाला गवसणी

आशियाई दुहेरी स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताच्या अभय सिंह यानं पुरुष आणि मिश्र दुहेरी अशा दोन्ही प्रकारांमध्ये अजिंक्यपदाला गवसणी घातली. पुरुष दुहेरीत वेलावन सेंथिलकुमार याच्या साथीनं त्यानं मलेशियाच्या ओंग साइ हुंग आणि स्याफीक कमल या जोडीवर ११-४, ११-५ असा सहज विजय मिळवला. तर पुरुष दुहेरीत त्या...

July 7, 2024 6:27 PM

कुस्तीपटू विनेश फोगटला स्पेन ग्रांप्रीमध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक

स्पेनच्या माद्रिद इथं ग्रां प्री ऑफ स्पेन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगटनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत फोगटनं रशियाच्या मारिया ट्युमेरेकोव्हावर १०-५ अशी मात केली.    विनेश आता पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी २० दिवसीय प्रशिक्षणासाठी फ्रान्सला रवाना...

July 7, 2024 3:13 PM

स्केटिंगपटू असित कांबळेचा १०० मीटर स्केटिंगमध्ये विश्वविक्रम

बेळगाव इथं आयोजित गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड स्पर्धेत असित कांबळे या स्केटिंगपटूनं १०० मीटर स्केटिंगमध्ये विश्वविक्रम रचला आहे. असित यानं दोन चाकांच्या पाठमोऱ्या स्केटिंग प्रकारात १०० मीटर अंतर केवळ १४ पूर्णांक ८४ शतांश सेकंदांमध्ये पूर्ण करत गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपल्या नावाची नोंद केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.