खेळ

July 24, 2024 2:58 PM

महिला आशिया टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरीत दाखल

  महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं अ गटातल्या अंतिम सामन्यात नेपाळवर ८२ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत १७८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना नेपाळला २० षटकांत अवघ्या ९६ धावा करता आल्या. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा हिनं ४८ ...

July 23, 2024 10:48 AM

स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज चार्ली कॅसलनं रचला नवा इतिहास

आयसीसी विश्वचषक लीग 2 मधील पुरुषांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज चार्ली कॅसल यानं पदार्पणातच 21 धावांमध्ये 7 गडी बाद करत आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढून नवा इतिहास रचला आहे. काल डंडी इथं झालेल्या ओमान विरुद्धच्या सामन्यात त्यानं पाच षटकं आणि चार चेंडूत 7...

July 23, 2024 10:03 AM

भारताचे ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना “ऑलिंपिक ऑर्डर” हा बहुमान जाहीर

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणारे पहिले भारतीय क्रीडापटू अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा बहुमान देऊन सन्मानित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळानं घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये येत्या १० ऑगस्ट रोजी बिंद्रा यांना हा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे. बिंद्र...

July 22, 2024 1:45 PM

बीसीसीआयकडून ऑलिम्पिक खेळाडूंना साडे आठ कोटी रुपये अर्थसहाय्य

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला साडे आठ कोटी रुपये देण्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी केली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी या आर्थिक मदतीबद्दल शाह यांचे आभार मानले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात ७० पुरुष आणि ४७ महिलांसह ...

July 21, 2024 7:46 PM

स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेत ऑरलँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद

स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेत ऑरलँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. राझीलच्या या जोडीनं फ्रान्सच्या ग्रेगोयर जॅक आणि मॅन्युअल गुइनार्ड या जोडीचा ७-५, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी राफेल नादाल आणि पोर्तुगालचा नुनो बोर्जेस यांच्यात अंतिम लढत...

July 21, 2024 7:17 PM

महिला आशिया चषक टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी विजय

  महिला आशिया चषक टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकात ५ गडी गमावून २०१ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६६, तर रिचा घोषनं २९ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. फाली वर्मानं ३७ धावांचं योगदान दिलं.   भारता...

July 21, 2024 2:49 PM

फ्रान्सच्या ग्रेगोयर जॅक आणि मॅन्युअल गुइनार्ड या जोडीचा सामना ब्राझीलच्या ऑरलँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीसोबत होणार

स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या विजेतेपदासाठी आज फ्रान्सच्या ग्रेगोयर जॅक आणि मॅन्युअल गुइनार्ड या जोडीचा सामना ब्राझीलच्या ऑरलँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीसोबत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३ वाजता ही लढत सुरू होईल. फ्रान्सच्या जोडीनं इक्वेडोर आणि कझाकस्तानच्या अलेक्झांडर आ...

July 20, 2024 8:27 PM

महिलांच्या आशिया चषक टी 20 क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा मलेशियावर २२ धावांनी विजय

श्रीलंका इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज थायलंडने मलेशियावर २२ धावांनी विजय मिळवला. रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात थायलंडने मलेशियासमोर १३४ धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं, मात्र मलेशियाला ८ गडी गमावून १११ धावांपर्यंतच मजल मारता आली. याच म...

July 20, 2024 8:21 PM

राफेल नदालची स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

राफेल नदालने स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. क्रोएशियाच्या ड्युए आजुकोविकचा त्यानं ४-६, ६-३, आणि ६-४ असा तीन सेट्स मधे पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तियागो ऑगस्टीन तिरांते आणि नुनो बोर्जेस यांच्यात लढत होत असून, त्यातल्या विजेत्याचा सामना अंतिम फेरीत नदालबरोबर होईल...

July 20, 2024 1:59 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलाचे २४ जवान

पॅरिस इथं येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंमध्ये चोवीस सशस्त्र दलाचे जवान सहभागी होणार आहेत. सुप्रसिद्ध भालाफेकपटू आणि २०२० मधल्या टोकियो ऑलिंपिक मधला सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा याच्यासह एकूण २२ पुरुष आणि दोन महिला खेळाडू य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.