प्रादेशिक बातम्या

July 17, 2024 7:22 PM

पुणे जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते-पदाधिकारी शरद पवारांकडे परतले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून ४ नेते आणि २४ पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील झाले. बारामती इथं एका कार्यक्रमात, अजित गव्हाणे, आज़म पानसरे, माजी आमदार विलास लांडे आणि इतर नेते-कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यातले २४ जण पिंपरी चिंचवड महानगर...

July 17, 2024 8:38 PM

३८ एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये संगणकीकरण करण्याच्या प्रकल्पाबाबत राज्यपालांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण-जेएनपीए नं आपला सामाजिक दायित्व निधि उपलब्ध करून दिल्यामुळे राज्यातल्या एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांचे आदिवासी विद्यार्थी आजच्या स्पर्धात्मक युगाला आत्मविश्वासानं सामोरे जाऊ शकतील असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत राजभवन...

July 17, 2024 7:07 PM

खरीप हंगाम २०२३च्या पीक स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल जाहीर

राज्यात खरीप हंगामातल्या पिकांसाठी २०२३ मध्ये घेतलेल्या खरीप हंगाम स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल जाहीर झाले आहेत. यात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल अशा ११ पिकांचा समावेश आहे.    या स्पर्धेच्या, भात सर्वसाधारण गटात, चंद्रकात म्हातले यांना प्रथम क्रमां...

July 17, 2024 8:37 PM

पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात पंढरपूर इथं वारकऱ्यांची अलोट गर्दी झाली आहे. श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजा सपत्नीक केली. राज्यात भरपूर पाऊस-पाणी होऊ दे, माझा शेतकरी सुखी-समाधानी राहू दे अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलचरणी केली. मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून...

July 17, 2024 6:58 PM

मराठा-ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू – शरद पवार

राज्यात शांतता नांदावी यादृष्टीनं, मराठा-ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या समुदायांमधला वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती, मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना भेटून केली, त्या पार्श...

July 17, 2024 6:34 PM

राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पंढरपूर इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. विठ्ठल मंदिर संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शाहू महाराज सांस्कृतिक भवना...

July 17, 2024 6:27 PM

राज्यात सर्वत्र आषाढी एकादशीचा उस्ताह

राज्यात विविध ठिकाणी आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथल्या संत गजानन महाराज संस्थानात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.      परभणी जिल्ह्यातल्या मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय शाळेत आषाढीनिमित्त...

July 17, 2024 3:51 PM

दूध प्रक्रिया केंद्रांनी २० लाख लिटर दूधाचं संकलन करावं – मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

राज्‍यातला अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अमूल उद्योग समुह तसंच इतर प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूधाचं संकलन करावं असं आवाहन, दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलं आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रीया केंद्राच्‍या प्रमुखांच्...

July 17, 2024 3:26 PM

गडचिरोली जिल्हा भविष्यात राज्यातला अग्रेसर जिल्हा असेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातला सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या प्रकल्पाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते गडचिरोली इथं झालं त्यावेळी ते बोलत होते. अहेरी ता...

July 17, 2024 3:21 PM

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक

रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या रुपये ४३२ कोटी, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत २८ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ४१ कोटी ६१ लक्ष अशा एकूण ५०१ कोटी ६१ लक्ष रुपयांच्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.