प्रादेशिक बातम्या

July 19, 2024 9:37 AM

जालना जिल्ह्यात भाविकांच्या गाडीला अपघात

जालना जिल्ह्यात प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप रस्त्यालगतच्या विहिरीत पडून सात जणांचा मृत्यू झाला. बदनापूर तालुक्यातल्या चनेगाव इथले काही भाविक पंढरपूर वारीकरून जालना इथं परतत असतांना, काल संध्याकाळी जालना-राजूर मार्गावर तुपेवाडी फाट्याजवळ खडेश्वर बाबा मंदिर परिसरात या जीपची एका दुचाकीशी धडक झाली, ...

July 18, 2024 7:33 PM

धुळ्यात सोनगीर ग्रामपंचायतीत शौचालय अनुदान घोटाळा उघडकीस

धुळे जिल्ह्यात सोनगीर ग्रामपंचायतीत शौचालय अनुदान घोटाळा झाल्याचं उघडकीला आलं असून, या प्रकरणी महिला सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी आणि तीन लाभार्थीं विरोधात २१ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.   सोनगीर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी १५ एप्रिल २०२० ते ३ ऑक्टोबर २०...

July 18, 2024 7:31 PM

मराठी विज्ञान परिषदेच्या शिष्यवृत्तीसाठी ३२ विद्यार्थ्यांची निवड होणार

मराठी विज्ञान परिषदेच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी या वर्षी ३२ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या शिष्यवृत्तीकरता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयातल्या प्रत्येकी आठ म्हणजे एकूण ३२ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात एम.एससी. किंवा एम.ए.गणित ह्या अभ्य...

July 18, 2024 7:04 PM

‘राज्यातल्या १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार’

राज्यातल्या एक हजार महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या करता आतापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी अर्ज केल्याची माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.  &nbsp...

July 18, 2024 7:08 PM

गडचिरोलीत चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्यानं नक्षलवाद्यांच्या दोन दलमचा बीमोड

गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमेलगतच्या जंगलात काल पोलिसांबरोबरच्या चकमकीत दोन दलमचा बीमोड झाल्याचं पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले होते. त्यांच्यावर एकूण ३० लाख रुपयांचं बक्षीस होतं. या कारवाईमुळे उत्तर गडचिरोलीत सक्रिय असलेल्या ‘टिपागड ...

July 18, 2024 7:21 PM

मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यात पौड इथल्या पोलिसांनी काल अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. एका शेतकऱ्याला बंदूक रोखू...

July 18, 2024 3:55 PM

धुळ्यात ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ अभियानास प्रारंभ

धुळे वनविभागच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ अभियानातर्ंगत वनविभाग तसेच रोहयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिसरण पद्धतीने धुळे तालुक्यातील सांजोरी गावात २२ हेक्टरवर वृक्षारोपण कार्यक्रम आज राबवण्यात आला.     या वृक्षलागवडीस...

July 18, 2024 3:47 PM

राज्यात विविध भागात पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागांत पावसानं जोर धरला आहे. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली.  शहरातले रस्ते आणि पुलांवर पाणी साचल्यामुळे आज सकाळी अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी दिसून आली, मात्र सर्व उपनगरी रेल्वे मार्गांवरची सेवा सुरळीत सुरु आहे.    रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारपासून पावसानं पुन...

July 18, 2024 3:42 PM

येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तसंच कोकणात  बहुतांश  ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  कोकण  किनारपट्टीवर जोरदार  वारा वाहण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.

July 18, 2024 3:37 PM

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अटक

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यात पौड इथल्या पोलिसांनी काल अटक केली. एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला  होता. तेव्हापासून मनोरमा  फरार होत्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.