प्रादेशिक बातम्या

July 19, 2024 7:38 PM

राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी

कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर जोरदार पाऊस सुरु आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यात धुवांधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातली चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली असून, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातल्या नद्यांवरचे ७४ ब...

July 19, 2024 7:25 PM

मुंबई उपनगरातल्या विकासकामांसाठी १ हजार ८८ कोटी रुपयांची तरतूद – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विकासकामांसाठी १ हजार ८८ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. या निधीपैकी एक हजार १२ कोटी जिल्हा वार्षिक योजनेसाठी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ७१ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरच्या योजनेसाठी ५ क...

July 19, 2024 7:20 PM

मविआ विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरी जाणार – काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल

महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरी जाणार असून तिन्ही घटकपक्ष एकत्र बसून जागावाटपावर चर्चा करतील, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीत का...

July 19, 2024 7:08 PM

नंदुरबार : प्रलंबित वनदावे मार्गी लावण्यासाठी बैठका घेण्याचे निर्देश

नंदुरबारमधले प्रलंबित वन दावे वर्षभरात मार्गी लावण्यासाठी तालुकानिहाय चार सदस्यीय समितीची स्थापन करुन दर महिन्याला आढावा बैठका घेण्याचे निर्देश दिल्याचं राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष  अंतरसिंग आर्या यांनी आज सांगितलं. ते नंदुरबारच्या दौऱ्यावर असून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढा...

July 19, 2024 5:14 PM

रायगड : कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या अन्वी कामदार हिचा रील्स करताना पाय घसरल्याने दरीत पडून मृत्यू झाला; या दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे.   पोलीस प्रशासनानं धबधबे, नदी, धरण, डोंगर परिसरात जीव धोक्यात घालणारी हुल्लडबाजी (स्टंटबाजी) करण्याबाबत...

July 19, 2024 3:49 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूजा खेडकर विरोधात खटला दाखल

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने खटला दाखल केला आहे. परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन करत पूजा खेडकर यांनी स्वतःचं, वडिलांचं आणि आईचं नाव बदललं.तसंच फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल नंबरसह पत्ता बदलून आपली खोटी ओळख दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर ठ...

July 19, 2024 3:20 PM

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं १ ते १८ सप्टेंबर या काळात गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई सीएसएमटी स्थानक ते सावंतवाडी आणि रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि कुडाळ,तसेच दिवा जंक्शन ते चिपळूण दरम्यान दोन्...

July 19, 2024 3:14 PM

दुधाला हमी भाव मिळवून देण्‍यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं कायदा करावा- राधाकृष्‍ण विखे पाटील

दुधाला हमी भाव मिळवून देण्‍यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं कायदा करावा, अशी मागणी दुग्ध व्‍यवसाय मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सहकार मंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. दूध दरातल्या चढ-उताराचा मोठा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन सरकारनं दूध उत्‍पादकांना दिलासा ...

July 19, 2024 9:43 AM

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही –मुख्यमंत्री

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातील महत्वाकांक्षी सात योजनांबाबत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हास्तरावर प्रत्येक योजनेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करा; तसंच या योजनांचा दर आठवड्याला आढावा घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांन...

July 19, 2024 9:32 AM

महाराष्ट्र सरकार नव्या पर्यटन धोरणाद्वारे १८ लाख रोजगार निर्मिती करणार

राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचं पर्यटन धोरण - २०२४ तयार करण्यात आलं असून याद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १८ लाख रोजगार निर्मिती करणार आहे, अशी  माहिती पर्यटन यांनी काल दिली. दहा वर्षात पर्यटन स्थळं तसंच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.