प्रादेशिक बातम्या

July 22, 2024 8:04 PM

मालवणच्या किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरावरच्या गावांतल्या विद्युत वाहिन्या भूमिगत होणार

मालवणच्या किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरावरच्या गावांतल्या विद्युत वाहिन्या आता भूमिगत होणार आहे. तसंच कुडाळ आणि मालवण तालुक्यांना जोडणारी वाहिनीही भूमिगत केली जाणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पांतर्गत या कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणच्या मालवण आणि कुडाळ या विभागांसाठी ६७ क...

July 22, 2024 7:53 PM

मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.  २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस ...

July 22, 2024 7:30 PM

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्यांचा कालावधी

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे आता अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांपर्यंत हे विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्र...

July 22, 2024 10:34 AM

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबईसह कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि राज्यातल्या अन्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा प्रशासन, पोलीस तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावं आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश मुख्यमंत्री ए...

July 22, 2024 7:37 PM

रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट

राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर ठिकठिकाणी नदी नाल्यांचे प्रवाह फुगले आहेत.  राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदा सर्वाधिक पाऊस पडला असून, १२ जिल्ह्यांमध्ये सरा...

July 21, 2024 8:09 PM

मुंबई मराठी पत्रकार संघात २३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण

२३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल मुंबई मराठी पत्रकार संघात झाला. ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचे प्रथम पारितोषिक दीपावली या अंकाला, द्वितीय पारितोषिक ऋतुरंग आ...

July 21, 2024 7:55 PM

पुण्यात आणखी ४ रुग्णांना झिका विषाणूची लागण

पुण्यात आणखी ४ रुग्णांना झिका विषाणूची लागण झाल्याचं निदान झाल्यानं रुग्णांची एकूण संख्या आता ३२ वर पोहोचली आहे. हे रुग्ण पुण्याच्या येरवडा, वडगाव बुद्रुक, प्रभात मार्ग आणि विधी महाविद्यालय मार्ग या परिसरातले आहेत. यापैकी २३ रुग्णांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार सुरु आहेत तर ४ जणांना रुग्णालयात दाखल क...

July 21, 2024 7:35 PM

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल – गृहमंत्री अमित शहा

  महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात भाजपाच्या महाअधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलत होते.   केंद्राकडून महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाला, युती सरकारच्या काळात बरीच विकासकामं झाली, अनेक मोठे...

July 21, 2024 6:43 PM

आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या याचिकांवर २३ जुलैला सुनावणी

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर,आमदार अपात्रेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर येत्या मंगळवारी म्हणजेच २३ जुलैला सुनावणी होणार आहे. यासंदर्भात झालेल्या मागच्या सुनाव...

July 21, 2024 2:56 PM

वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदातल्या सिद्धांतांचा अभ्यास करून या क्षेत्रात संशोधन करावं – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव

वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदातल्या सिद्धांतांचा अभ्यास करून या क्षेत्रात संशोधन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल वर्धा इथं केलं. वर्ध्याच्या दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाच्या १५व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या समारंभात वैद्यकीय, दंतविज्ञान,...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.