प्रादेशिक बातम्या

July 27, 2024 10:54 AM

मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून भारतीय हवामान विभागानं मुंबईसाठी दक्षतेचा पिवळा बावटा दाखवला आहे. मुंबईमध्ये काल तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागानं मुंबईसह पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी देखील पिवळा बावटा तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी नारंगी बावटा जारी केला आहे.

July 27, 2024 9:50 AM

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचं संकट

  कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात पाणी घुसू लागलं असून, नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प झाली आहे. अधून मधून कोसळणाऱ्या सरी वगळता पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा‌ अद्याप कायम आहे. यामुळे २६५ मालमत्तांची पडझड झाली असून जिल्ह्यात आज पर्यंत ९८.६२ लाख रुपयांचं नुक...

July 26, 2024 8:28 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मुंबई दौरा पुढे ढकलण्यात आला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या २९ तारखेचा मुंबई दौरा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलला आहे. महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या २९ तारखेला वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन, तसंच महाराष्ट्र विधीमंडळातल्या सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू आणि उ...

July 26, 2024 7:38 PM

पुण्यात स्वच्छता मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुण्यात काल अतिवृष्टीमुळे पसरलेला चिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महा...

July 26, 2024 7:10 PM

भाजपाचे रमेश कुथे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

भाजपाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आज मुंबईत शिवबंधन बांधून घेउन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

July 26, 2024 8:33 PM

मविआतल्या घटक पक्षांशी जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून १० जणांची समिती स्थापन

महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी जागावाटपाची चर्चा करण्याकरता काँग्रेसनं १० जणांची समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्रातल्या जागावाटपाची चर्चा नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, आरिफ खान, सतेज पाटील करणार आहेत. वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख मुंबईतल्या ...

July 26, 2024 4:05 PM

रायगड आणि सातारा तसंच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

पुण्यात काल अतिवृष्टीमुळे पसरलेला चिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महापालिका यांच्यातल्या समन्वयाअभावी कालची पूरपरिस्थिती उद्भवली. यापुढे प्रशासन तसंच अधिकाऱ्यांनी ही काळज...

July 26, 2024 3:17 PM

गौरी गणपती उत्सवानिमित्त “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याचा शासनाचा निर्णय

गौरी गणपती उत्सवानिमित्त यंदा राज्यातल्या सुमारे १ कोटी ७० लाख शिधापत्रिका धारकांना "आनंदाचा शिधा" वितरीत करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.   प्रतिसंच १०० रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या या संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असणार आहे....

July 26, 2024 3:11 PM

नांदगाव पेठ इथे झालेल्या ट्रक आणि कार अपघातात २ जण ठार

अमरावती नजीकच्या नांदगाव पेठ इथे काल ट्रक आणि कारची धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मृत आणि जखमी व्यक्ती अकोल्यातल्या मोठी उमरी भागातले रहिवासी आहेत.

July 26, 2024 1:01 PM

महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्यात येणार

राज्यात छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यात तातडीनं कांदा बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. काल कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते.    कांदा हे नाशवंत पीक असून त्याची नासाडी रोखण...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.