प्रादेशिक बातम्या

August 3, 2024 7:38 PM

मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना कर...

August 3, 2024 7:34 PM

भाजपा हा संविधान आणि लोकशाही न मानणारा पक्ष – अतुल लोंढे

भाजपा हा संविधान आणि लोकशाही न मानणारा पक्ष असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे केली आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. नागपुरात म्हाळगीनगर आणि मानेवाडा वळण रस्त्याच्या उड्डाण पुलाचा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या स्थानिक आमदारांना निमंत्रण दि...

August 3, 2024 7:31 PM

राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारण्यात येणार

विद्यार्थ्यांना राज्य घटनेचं महत्व पटवून देण्यासाठी राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारलं जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं येत्या १५ ऑगस्ट रोजी एकत्रितपणे या संविधान मंदिरांचं उद्घाटन ऑनलाइन होणार असल्याची माहिती मंत्री मं...

August 3, 2024 4:04 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे – देवेंद्र फडणवीस

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस अधिकारी सचिन वाजे यांच्या आधारे नागपुरात सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना अटक करण्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्य...

August 3, 2024 1:22 PM

मुंबई मध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. उपनगरी रेल्वे गाड्या नियमित वेळेत धावत आहेत.   मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला हवामान विभागानं आज जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, पुणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर ज...

August 2, 2024 7:42 PM

रक्षाबंधनाच्या सणापूर्वी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार

रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज सिल्लोड इथं या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पणनमंत्री तथा छत...

August 2, 2024 8:22 PM

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा नामांतर प्रकरणातील हस्तक्षेपाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे असं मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करायला नकार दिला. जिल्ह्याचं नाव बदलायचं असेल, तर सूचना आ...

August 2, 2024 6:37 PM

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठी भाषेतले अर्ज ग्राह्य धरले जातील’

'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठी भाषेत केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज स्पष्ट केलं. या योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत असून अर्जाच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मराठी भाषेतल्या अर्जांचा विषय चर्चेला आला होता. परंतु ही...

August 2, 2024 6:31 PM

नागपूरसाठी १२०० कोटींहून जास्त निधीचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर जिल्ह्यासाठी बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा विकास आराखडा जिल्हा नियोजन विकास बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ हजार कोटीपेक्षा जास्त मूल्याची कामं राज्य शासनाच्या वतीने करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी...

August 2, 2024 5:52 PM

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध

वाशिम जिल्ह्यात पावसानं  सरासरी ओलांडली असली तरी वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये मात्र पाण्याचा साठा वाढलेला नाही. या प्रकल्पात केवळ पस्तीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी या प्रकल्पातला जलसाठा वाढला नसल्याने वाशिमकरांमध्ये चिंता पसरली आहे. या ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.