August 4, 2024 7:08 PM
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना
भारतीय हवामान विभागानं पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर धोकादायक भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं, त्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्याची मदत घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसंच, बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्...