प्रादेशिक बातम्या

August 6, 2024 7:09 PM

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षीतता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

बांगलादेशातल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.  बांगलादेशातल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता, परराष्ट्र मंत्रालयानं तिथे अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्...

August 6, 2024 6:09 PM

मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं. ...

August 6, 2024 4:05 PM

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं आहे. गंगापूर धरणातला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या यावेळेपेक्षा दोन टक्के जास्त असला तरी जिल्ह्यातल्या २४ जलाशयात मिळून ६१ पूर्णांक ६२ शतांश टक्के साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातल्या पालखेड धरणात ६६ टक्के आणि दारणा धरण समुहात ८६ टक्के इतका पाणीसाठा आहे...

August 6, 2024 3:57 PM

पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले रुग्णांची संख्या ६६ वर

पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या ६६वर पोहोचली आहे. यामध्ये २६ गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांचं परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या...

August 6, 2024 3:49 PM

पालघर जिल्ह्यात आश्रमशाळेतल्या मुलांना जेवणातून विषबाधा

पालघर जिल्ह्यातल्या नंडोरे इथल्या आश्रमशाळेतल्या मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचं लक्षात आलं आहे. उलटी, मळमळ, यासारखा त्रास झाल्यानं या मुलांना आज पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्ह्यातल्या आणखी काही आश्रमशाळेतल्या मुलांनाही जेवणातून विषबाधा झाल्याचं दिसून आलं आहे. पालघर ग्रामीण र...

August 6, 2024 8:47 AM

पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी समूह विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे प्रस्ताव सादर करावेत; त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विधान प...

August 5, 2024 7:47 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत आहे, असा आरोप करत नवी मुंबईतले सनदी लेखापाल नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचि...

August 5, 2024 7:16 PM

देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देणार – मंत्री चंद्रकांत पाटील

येणाऱ्या काळात देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देणार आहे. त्यामुळे उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी शिक्षणावर जास्त खर्च करायचा आहे, असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावमधल्या अंमळनेर इथं केलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपके...

August 5, 2024 7:47 PM

जोरदार पावसामुळे पाणीपातळी वाढल्यानं अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.   गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अने...

August 5, 2024 7:17 PM

जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांना माध्यमांनी स्थान देवू नये – राज ठाकरे

राज्यात सामाजिक वातावरण कलुषित झालं असून, जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांना माध्यमांनी स्थान देऊ नये, असं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मनसे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून, त्या अनुषंगानं निवडणुकीत किती आणि कशा जागा लढवायच्या हे ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.