प्रादेशिक बातम्या

August 7, 2024 6:59 PM

राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनाच्या कृती समितीची बैठक

राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनाच्या कृती समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने बैठक घेऊन उच्चाधिकार समितीने याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महामंडळाचं उत्पन्न वाढावं यासाठी दोन हजार नवीन...

August 7, 2024 8:34 PM

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यातल्या अल्पसंख्यंकांच्या उन्नती करता टार्टी, बार्टी, महाज्योतीच्या धरतीवर मार्टी अर्थात अल्पसंख्यांक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संस्थेसाठी एकूण ११ पदं निर्माण केली जातील. तसंच प्रशासनिक खर्चासाठी ६ कोटी २५...

August 7, 2024 6:29 PM

पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन देण्यात येणार आहे. १२ वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना ६ हजार, आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना ८ हजार तर पदवीधर किंवा पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना १० हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असे...

August 7, 2024 6:24 PM

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे २ हजार ३० सदनिकांसाठी ९ ऑगस्टला सोडत

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे शहरातल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पातल्या २ हजार ३० सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपासून अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यासंबंधीची जाहिरात उद्या विविध वृत्तपत्रांत तसंच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद...

August 7, 2024 3:54 PM

भाजपा आमदार आशीष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत काँग्रेस नेत्यांना भेटायला जातात, मात्र महाराष्ट्रातले प्रश्न मांडत नाहीत, अशी टीका भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. राज्यातले नेते दिल्लीला गेले तर ठाकरे टीका करतात, पण स्वतः काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला जातात असंही शेलार म्हणाले.

August 7, 2024 3:50 PM

नागपुरात इतवारी बाजारपेठेत अत्तराच्या गोदामाला आग, एकाचा मृत्यू

नागपूर शहरातल्या इतवारी या मुख्य बाजारपेठेत अत्तराच्या गोदामाला लागलेल्या आगीत एका तरुणीचा होरपळून मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. दुर्घटनेतल्या जखमींमध्ये एका जोडप्याचा समावेश असून त्यांच...

August 6, 2024 7:33 PM

केरळ आणि आसामला महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी १० कोटींची मदत

केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीवित आणि वित्तहानी झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं केरळला १० कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसंच जुलै महिन्यात आसाम राज्यात पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यातून सावरण्यासाठी आसामलाही महाराष्ट्र...

August 6, 2024 7:29 PM

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्यशासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग पुरस्कार

यंदाच्या गणेशोत्सवात राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्यशासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग पुरस्कार देऊन गौरवणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४  जिल्ह्यातून प्रत्येकी ३  आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ४४ प्राप्त शिफारशींमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच...

August 6, 2024 7:24 PM

खासगी महाविद्यालयातला हिजाब आणि बुरखा बंदीचा नियम कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

मुंबईतल्या खासगी महाविद्यालयातला हिजाब आणि बुरखा बंदीचा नियम कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज मंजुरी दिली. मुंबईतल्या चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयाच्या परिसरात ...

August 6, 2024 7:20 PM

आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सोडवावा – नाना पटोले

आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सोडवावा, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.  आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपानं मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करुन सामाजिक एकोप्याला बाधा पोहचवली जात आहे. आरक्षणाचा निर्णय सत्तेत ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.