प्रादेशिक बातम्या

August 8, 2024 7:16 PM

यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान अंतर्गत सन २०२३ साठी यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड झाली आहे. हा कार्यक्रम वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कऱण्यात आला होता. यावेळी संरपंच आणि सचिवांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आला.

August 8, 2024 7:01 PM

नंदुरबार इथं तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन

जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार इथं तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवा अंतर्गत  नंदुरबार शहरातून आज भव्य रॅली काढण्यात आली.  यात राज्यभरातून आलेल्या आदिवासी कलापथकांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे तारपा वाद्य वाजवत ...

August 8, 2024 3:32 PM

रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या विविध विषयाबाबत आढावा बैठक

रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या मराठवाडा उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जालना इथल्या उपकेंद्राच्या पदनिर्मितीस मान्यता आणि मूल्यनिर्धारण अहवालानुसार संस्थेस देय असले...

August 8, 2024 7:22 PM

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नाशिकमध्ये दिंडोरी इथं आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रद...

August 8, 2024 3:15 PM

बांगलादेशात कापसाच्या वाढत्या मागणीमुळे कापूस निर्यातीत वाढ

बांगलादेशात कापसाच्या वाढत्या मागणीमुळे भारताच्या कापूस निर्यातीत वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. बांगलादेशातल्या सूत गिरण्यांमध्ये कापसाची मागणी वाढत असल्यामुळे भारताची कापूस निर्यात दोन तृतीयांश टक्के वाढणार आहे. या वर्षी २६ लाख गाठी इतकी निर्यात होईल, असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे...

August 8, 2024 3:48 PM

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थी, अभियंत्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा

बांगलादेशात अडकलेले राज्यातले विद्यार्थी आणि अभियंत्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांना मायदेशी परत आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन जयशंकर यांनी यावेळी दिलं. या विद्यार्थ्यांना परत ...

August 8, 2024 3:11 PM

बांगलादेशातल्या राजकीय अस्थिरतेमुळं कांदा निर्यात तात्पुरती बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

बांगलादेशातल्या राजकीय अस्थिरतेमुळं महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी कांदा निर्यात तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच निर्यात पुन्हा सुरू होईल.   बांगलादेशातली कांद्याचा सर्वात जास्त पुरवठा भारतातून होतो. महाराष्ट्रातल्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि पु...

August 7, 2024 7:45 PM

जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून १५ टीएमसी पाणी सोडलं

नाशिक जिल्ह्यात चार दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातली सहा धरणं भरली आहेत तर आणखी सहा धरणांमध्ये ८० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत पंधरा टीएमसी पाणी सोडल्याचं जलसंपदा विभागानं सांगितलं.   गेल्या २४ तासात पावसाने विश्रांती घेतली...

August 7, 2024 8:35 PM

महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची काँग्रेसची भूमिका

महाविकास आघाडीत कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं.   विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत गां...

August 7, 2024 8:37 PM

पुण्यात एकही झिकाबाधित नाही, सर्व रुग्ण झिकामुक्त

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून झिकाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नसून लागण झालेले सर्व रुग्ण पूर्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. यात २६ गरोदर महिलांचा समावेश आहे. पुणे शहरात २० जून रोजी झिकाचा पहिला रुग्ण आढळून आला होता .  त्यामुळे महापालिकेने औषध फवारणी, नागरिकांची आरोग्य तपासणी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.