प्रादेशिक बातम्या

August 10, 2024 7:08 PM

राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवला जात आहे – राज ठाकरे

राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवला जात आहे अशी खंत नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.  छत्रपती संभाजीनगर इथे ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेचा समारोप झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आपली भूमिका मांडत होते. महाराष्ट्रात उपलब्ध संधीचा सुयोग्य वापर केला तर आर...

August 10, 2024 6:54 PM

बेस्ट उपक्रमातर्फे ‘बेस्ट इतिहास आणि उपक्रमाची प्रगतीशिल कार्यप्रणाली’ चं सखोल माहिती दर्शविनारे प्रदर्शन

७ ऑगस्ट रोजी झालेल्या बेस्ट दिनाच्या पार्श्वभूमीवर 'बेस्ट उपक्रमाचा इतिहास आणि उपक्रमाची प्रगतीशिल कार्यप्रणाली' याबाबतचं सखोल माहिती दर्शवणारं प्रदर्शन बेस्ट उपक्रमाने  बेस्टच्या आणिक आगारातल्या बेस्ट संग्रहालय इथं आयोजित केलं आहे. ९ ऑगस्टपर्यंत असलेल्या या प्रदर्शनाची कालमर्यादा वाढवून रविवार दिना...

August 10, 2024 6:39 PM

लाडकी बहीण योजना फसवी असून मतदारांच्या मतांवर डोळा ठेवून ती सुरु करण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना फसवी असून मतदारांच्या मतांवर डोळा ठेवून ती सुरु करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेस पक्षाच्या लातूर, धाराशीव, बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज लातूरमध्ये झाला त्यावेळी उपस्थित नेत्यांनी हा आरोप केला. या मेळाव्याला काँग्रेसचे राज्य ...

August 10, 2024 3:55 PM

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राला दिली भेट

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान आज आकाशवाणी मुंबई केंद्राला भेट दिली आणि सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला. श्रोत्यांना आवडण्याजोग्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना त्यांनी आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान केली. युवा आणि महिला कें...

August 10, 2024 3:46 PM

रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी “लिओ पॉलिमर तंत्रज्ञान” वापरण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी “लिओ पॉलिमर तंत्रज्ञान” वापरण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काल दिल्या. ठाणे नाशिक महामार्गावरच्या खारेगाव ते पडघा, तळवली ते शहापूर या रस्त्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.  या महामार्गावरची प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करावी तसंच का...

August 10, 2024 8:36 PM

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजारानं निधन

  ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० आण...

August 9, 2024 8:19 PM

हर घर तिरंगा अभियानाला राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर घरोघरी तिरंगा अभियानाचा प्रारंभ झाला. लाखो स्‍वातंत्र्यसैनिकांच्‍या त्‍याग आणि बलिदानातून देशाला स्‍वातंत्र्य मिळालं. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची जाणीव तरुणांना व्हावी आणि त्‍यांच्‍यात राष्‍ट्रीयत्‍वाची भावना रूजावी, यासाठी 'घ...

August 9, 2024 7:36 PM

कोकण रेल्वेमार्गावरच्या स्थानकांचं सुशोभिकरण आणि फलाटावर शेड उभारण्याच्या कामासाठी राज्यशासनाकडून प्रस्ताव पाठवावा – खासदार नारायण राणे

कोकण रेल्वेमार्गावरच्या स्थानकांचं सुशोभिकरण आणि फलाटावर शेड उभारण्याच्या कामासाठी राज्यशासनाकडून प्रस्ताव पाठवावा, असं खासदार नारायण राणे आज म्हणाले. ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभन कामाचं लोकार्पण आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. तर सिंधुदुर्ग किनारपट्...

August 9, 2024 7:28 PM

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८२० अंकांनी वधारला

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार बंद होतांना ८२० अंकांनी वधारून ७९ हजार ७०६ अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही २५० अंकांची वाढ होऊन तो २४ हजार ३६७ अंकांवर पोहोचला.

August 9, 2024 7:26 PM

यवतमाळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचं लोकार्पण

यवतमाळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचं लोकार्पण केलं. डबघाईला आलेल्या सूतगिरण्या खाजगी कंपनीला चालवायला देण्याचा निर्णय नवीन वस्त्रोद्योग धोरणात आहे असं त्यांनी सांगितलं. वस्त्रोद्योग मंत्रालयाने राज्यात घोषित केलेले वस्त्रोद्योग प्रकल्प यवतमाळ जिल्ह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.