प्रादेशिक बातम्या

August 11, 2024 8:07 PM

कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या अत्याधुनिक शीत गृहांकरता  ११ कोटी रूपये मंजूर

अहमदनगर जिल्ह्यातल्या  राहाता आणि  शिर्डी या परिसरातला  शेतमाल सुरक्षित रहावा यासाठी राहाता इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या  अत्याधुनिक शीत गृहांकरता  ११ कोटी रूपये मंजूर केले असल्याची माहिती  पणन आणि अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.   सत्तार यांच्या हस्ते आज  राहाता बाजार ...

August 11, 2024 8:00 PM

लाडकी बहिण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून ६ लाख १५ हजार १३६ अर्ज प्राप्त

राज्यशासनाच्यावतीनं सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून  आतापर्यंत विविध ठिकाणाहून जवळपास ६ लाख १५ हजार १३६ अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५ लाख ४२ हजार ८१९ अर्ज जिल्हास्तरीय समितीनं पात्र ठरवले असून पुढील कार्यवाहीसाठी हे पात्र अर्ज शासनाला सादर करण्यात...

August 11, 2024 7:48 PM

विधानसभा निवडणुकीला  काँग्रेस – महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार – काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला

विधानसभा निवडणुकीला  काँग्रेस - महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार आहेत, असं काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेडमध्ये बातमीदारांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्यावतीनं आज  नांदेडमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आयोजि...

August 11, 2024 7:31 PM

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत पनवेल महापालिकेचं तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत पनवेल महापालिकेनं आज तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. विद्यार्थी, नागरिक,  महानगरपालिका तसंच सुरक्षा विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि स्वच्छतादूत मोठ्या संख्येनं या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून सुरू झालेल्या या मॅरेथॉनची वडाळे तलाव इथ...

August 11, 2024 7:25 PM

विरोधकांच्या अपप्रचारामुळे भाजपाच्या जागा घटल्या, पण जनाधार घटला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं मत

लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अपप्रचार केल्यानं भाजपाच्या जागा कमी आल्या, पण आपला जनाधार कमी झालेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोल्यात भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.  कुठल्याच बहिणीला लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार...

August 11, 2024 7:15 PM

विराेधी पक्षातल्या नेत्यावरचा हल्ला म्हणजे महाराष्ट्रात अराजकता माजल्याचे लक्षण – आमदार जितेंद्र आव्हाड

विराेधी पक्षातल्या नेत्यावरचा हल्ला म्हणजे महाराष्ट्रात अराजकता माजल्याचे लक्षण आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शनिवारी ठाण्यात सभेपूर्वी शिवसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर मनसेच्या ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी हल्ला के...

August 11, 2024 7:22 PM

अशांत परिस्थिती होऊ नये याची काळजी त्या-त्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेण्याची गरज-डॉ. नीलम गोऱ्हे

ठाण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे एकप्रकारची राजकीय अशांतताच असून, अशांत परिस्थिती होऊ नये याची काळजी त्या-त्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतली पाहिजे, असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. त्या आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होत्या. पक्ष सं...

August 11, 2024 6:32 PM

बीड जिल्ह्यात मालगाडीखाली आल्यानं एका मेंढपाळासह २२  मेंढ्या,आणि दोन जनावरांचा  मृत्यू

बीड जिल्ह्यातल्या परळी जवळच्या मलकापूर शिवारातल्या धनगरतळ्याजवळच्या बोगद्यात आज सकाळी मालगाडीखाली आल्यानं एका मेंढपाळासह २२  मेंढ्या,आणि दोन जनावरांचा  मृत्यू झाला. मधुकर सरवदे हे मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याना  घेऊन जात असताना  समोरुन आलेल्या मालगाडीखाली आले.  या रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूनं  बचावास...

August 11, 2024 3:28 PM

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच जनतेसमोर जाणार – नाना पटोले

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नसून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच जनतेसमोर जाणार असल्याचं  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं  आहे. ते काल लातूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते.  मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण करून सरकारनं...

August 11, 2024 3:17 PM

राज्यातलं पहिलं १ हजार खाटांचं सामान्य रूग्णालय पंढरपूरात उभारण्याचा शासन निर्णय जारी

पंढरपूर इथं सर्व सुविधायुक्त राज्यातलं पहिलं १ हजार खाटांचं सामान्य रूग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.  नवनिर्मित १ हजार खाटांच्या या रूग्णालयात सामान्य रूग्णालय ३०० खाटा, महिला व शिशु रूग्णालय ३०...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.