प्रादेशिक बातम्या

August 17, 2024 10:36 AM

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा

महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या,...

August 17, 2024 10:35 AM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील काही पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं काही पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर तर प्रहार जनशक्ती पक्षाला क्रिकेटची बॅट हे चिन्ह मिळालं आहे.

August 17, 2024 10:33 AM

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची पक्षाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची पक्षाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून कार्यकारी समितीत स्थान देण्यात आलं आहे.

August 17, 2024 10:25 AM

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं राज्यात ७२ वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं राज्यात ७२ वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर मागास घटकातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शिक्षणाची मोठी सोय होणार असल्याचं, राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं सावे यांच्या...

August 17, 2024 10:20 AM

महिला बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते...

August 17, 2024 10:12 AM

घटकपक्षांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यास आपला पाठिंबा – उद्धव ठाकरे

राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करताना केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शर...

August 17, 2024 10:10 AM

धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी सुमारे आठ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड वर्ग

धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जलसंपदा विभागाची मोकळी जागा वर्ग करण्यात आली आहे. धाराशिवच्या तहसीलदारांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्याकडे या ८ हेक्टर ३० गुंठे जागेचा ताबा सोपवल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटी...

August 17, 2024 9:59 AM

७० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर-‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. आट्टम या मल्याळी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'ऊँचाई' या चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, 'तिरुचित्रमबलम' या चित्रपटासाठी नित्या मेनन आणि 'कच्छ एक्सप्रेस' चित्रपटासाठी मानसी पारेख सर्व...

August 16, 2024 7:38 PM

येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज

येत्या दोन दिवसात विदर्भात बहुतांश ठिकाणी, कोकणात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी, तर कोकण, मध्य महारा...

August 16, 2024 7:24 PM

शँपूच्या बाटल्यांमध्ये कोकेन…

गुप्तवार्ता महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आज मुंबई विमानतळावर नैरोबीहून आलेल्या एका महिलेला अटक केली. तपासणी केल्यानंतर या महिलेकडून शँपूच्या बाटल्यांमध्ये भरलेलं जवळपास दोन किलो कोकेन जप्त केलं. या कोकेनची किंमत जवळपास २० कोटी असल्याचं सांगितलं जातंय. य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.