प्रादेशिक बातम्या

August 19, 2024 5:27 PM

आचरा समुद्रात मासेमारी करणारी छोटी नौका उलटून तिघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा समुद्रात मासेमारी करणारी छोटी नौका उलटून आज तिघांचा मृत्यू झाला. मालवण तालुक्यातल्या सर्जेकोट इथून मासेमारीला गेलेली छोटी नौका आचरा हिर्लेवाडी इथल्या समुद्रात दाट धुक्यामुळे दुर्घटना ग्रस्त झाली. या दुर्घटनेत तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला तर एका खलाशानं पोहत किनारा गाठल्यानं...

August 19, 2024 6:33 PM

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला आहे. मराठा आरक्षण तसंच सगेसोयऱ्यांच्या मुद्दयावर मुख्यमंत्री शिंदे यांना काम करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे मात्र त्यांना देवेंद्र फडनवीस काम करू देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील या...

August 19, 2024 1:35 PM

नाशिकमध्ये देशातला पहिला एआय कुंभमेळा

देशातला पहिला एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. या अनुषंगानं काल  नाशिकमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या बिल्डथॉनचं, उद्धाटन विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी ...

August 19, 2024 1:44 PM

प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहंडीचा खेळ जगभरात पोहोचत असल्याचा आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहंडीचा खेळ जगभरात पोहोचतो आहे, याचा आनंद असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते वरळी इथं बोलत होते. खेळात स्पर्धा असावी, पण ती जीवघेणी असता कामा नये, असं सांगून अपघातमुक्त दहीहंडी साजरी करण्याचं आव...

August 19, 2024 10:19 AM

राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू

सिन्नरहून मुंबईकडे दूध घेऊन निघालेला दुधाचा टँकर काल दुपारी कसारा घाटातील दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला; तर चौघे जखमी झाले आहेत. टँकर भरधाव वेगात कसारा घाट उतरत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि लोखंडी संरक्षक कठड्याच्या जाळ्या तोडून अंदाजे 250 फूट खोल दरीत तो कोसळला. रायग...

August 19, 2024 10:15 AM

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कारासाठी प्राध्यापिका रोहिणी गोडबोले आणि डॉक्टर अजय सूद यांची, तर डॉक्टर कमला सोहोनी पुरस्कारासाठी डॉक्टर माधव गाडगीळ आणि डॉक्टर महताब बामजी यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड इथं 16 ते 18 ...

August 19, 2024 10:10 AM

संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी रत्नागिरीत निबे कंपनीची १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

राज्याचा उद्योग विभाग आणि संरक्षण क्षेत्रात काम करणारी निबे लिमिटेड कंपनी यांच्यात काल रत्नागिरीमध्ये सामंजस्य करार झाला. संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून सुमारे एक ते दीड हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. राज...

August 19, 2024 9:46 AM

ज्येष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक गोविंदा तुकाराम तथा गो. तु. पाटील यांचं रविवारी नाशिक इथं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी स्तंभलेखन, संपादन, बालकांसाठी लेखन, संतचरित्र या क्षेत्रात योगदान दिलं आहे. अनुष्टुभ या नियतकालिकाचे ते संपादक होते. वि. वा. शिरवाडकर यांच्या ’नटसम्राट समीक्षा’ या पुस्तकांचं संपादन पा...

August 19, 2024 9:33 AM

परळी वैद्यनाथ इथं २१ ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव

राज्याच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातल्या श...

August 19, 2024 11:04 AM

सातारा जिल्ह्यात राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा जिल्हयात पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी या राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या गावात महावितरणच्या वतीने शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्यांना सौर कृषीपंप योजना, प्रधानमंत्री सूर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.