प्रादेशिक बातम्या

August 20, 2024 8:33 AM

धाराशिव जिल्ह्यात ५ ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय

राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने धाराशिव इथं पाच ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जर्मनीला पाच लाख मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भात राज्य सरकारचा करार झाला आहे. त्याचाच...

August 19, 2024 8:28 PM

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक – लिपिक पदासाठी भर्ती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक - लिपिक पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भर्ती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी २० ऑगस्ट, म्हणजे उद्यापासून ९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरच्या https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर ...

August 19, 2024 7:45 PM

राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस

जालना शहरासह  जिल्ह्यातल्या मंठा, परतूर तालुक्यात आज दुपारी पावसानं  जोरदार हजेरी लावली. त्यामुळं खरिप हंगामातल्या  पिकांना जीवदान मिळालं  आहे. या जोरदार पावसामुळं परतूर तालुक्यातल्या नदी-नाल्यांना पूर आला आहे.  सात-आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दुपारी नाशिक शहरात मुसळधार पावसानं पुन्हा  हजेरी लावल...

August 19, 2024 7:39 PM

बीड जिल्ह्यात पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन

राज्याच्या कृषी विभागातर्फे २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातल्या शेतकऱ्या...

August 19, 2024 7:21 PM

राज्यात नारळी पौर्णिमा उत्साहानं साजरी

राज्यात आज  नारळी पौर्णिमा उत्साहाने साजरी होत आहे. कोळी बांधवांसाठी आपल्या मासेमारीचा नवा हंगाम सुरु करण्याचा हा दिवस. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत होण्याची प्रार्थना करुन आणि नारळ अर्पण करुन  होड्या समुद्रात लोटण्याची प्रथा आहे. या निमित्ताने किनापट्टीवरच्या  कोळी वसाहतींमधे विविध कार्यक्रम...

August 19, 2024 8:20 PM

नागपूरचं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात सामंजस्य करार

नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.   या करारानुसार मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागप...

August 19, 2024 6:54 PM

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कार वितरण

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचं वितरण आज अहमदनगरमधे करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे नवनियुक्त अध्‍यक्ष रविंद्र शोभणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर केंद्रीय आयुष राज्‍यमंत्री...

August 19, 2024 7:37 PM

महायुती सरकारच्या महिला, शेतकरी यांच्यासह विविध घटकांसाठी चांगल्या योजना – अजित पवार

महाराष्ट्रातल्या महिला आज स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहायला हवं म्हणूनच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वांद्रे पूर्व इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्त...

August 19, 2024 6:30 PM

नागपूरच्या सुप्रिया मसराम आणि शिवांश मसरामची इंडिया आणि आशिया रेकॉर्डस बुकमध्ये नोंद

नागपूरच्या सुप्रिया कुमार मसराम यांनी संविधानातली ७५ कलमं तोंडपाठ म्हणून दाखवण्याचा विक्रम केला आहे. त्यासाठी त्यांनी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता, पण त्यांनी अवघ्या ६ मिनिटं २१ सेकंदांत, उपस्थितांपुढे भराभर कलमं सांगून विक्रम केला. तर त्यांचा ११ वर्षांचा मुलगा शिवांशनं विज्ञानाच्या पुस्त...

August 19, 2024 6:17 PM

मांडवा ते मुंबई दरम्यान समुद्रातून प्रवासी फेरीबोट १ सप्टेंबरपासून सुरू होणार

रायगडमधील मांडवा ते मुंबई दरम्यान समुद्रातून प्रवासी फेरीबोट १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पावसाळ्यामुळे ही सेवा २६ मे पासून बंद ठेवण्यात आली होती. हवामान आणि समुद्राच्या लाटांचा अंदाज घेऊन मेरीटाईम बोर्डाने ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.