प्रादेशिक बातम्या

August 23, 2024 6:50 PM

महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई

बदलापूर इथल्या लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीला उद्या महाराष्ट्र बंद करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठासमो...

August 23, 2024 6:08 PM

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू – नाना पटोले

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. विधानसभा निवडणुकीसंदर्भात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे राज्यातले प्रमुख नेते नाशिकमध्ये आले असता वार्ताहर परीषदेत पटोले यांनी ही...

August 23, 2024 3:48 PM

महाविकास आघाडीनं पुकारलेला बंद हे विकृतीविरोधातलं आंदोलन – उद्धव ठाकरे

बदलापूरमध्ये दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला बंद हे विकृतीविरोधातलं आंदोलन असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळणार असून ...

August 23, 2024 3:43 PM

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. शहरातली बहुतांश दुकानं, शाळा-महाविद्यालयं बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शहर परिवहन उपक्रमासाह खासगी वाहतूक व्यवस्थाही बंद असल्यानं कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना पायपीट करावी ल...

August 23, 2024 7:18 PM

धुळे जिल्ह्याला आज रेड अलर्ट

धुळे जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला. पावसामुळे धुळे आणि साक्री तालुक्यातल्या जल प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.  मालनगांव, पांझरा, जामखेली प्रकल्प भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. अक्कलपाडा धरणातून आज दुपारी २४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पांझरा नदीला...

August 23, 2024 3:35 PM

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेंतर्गत वृक्षारोपण

एक पेड मां के नाम या मोहिमेअंतर्गत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण केलं. राष्ट्रीय उद्यानात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवण्यासंदर्भात त्यांनी बैठक घेतली. तुलसी आणि विहार या तलावांची माहिती घेऊन मुंबईतल्या पाणी पुरवठ...

August 23, 2024 3:27 PM

मर्यादित क्षेत्रावर शेती करण्याची स्थिती निर्माण झाली असल्यानं आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही – शरद पवार

मर्यादित क्षेत्रावर शेती करण्याची स्थिती निर्माण झाली असल्यानं आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल नव्या मुंबईत वाशी इथं संभाजी ब्रिगेडच्या २७ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होते.  शेत जमीन कमी होत असतानाच दुसर्‍या बाजूला शेतीवर बोजा वाढत चालला आहे. त्या...

August 23, 2024 9:31 AM

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल आज जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं जुलै आणि ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकनंतर हा निकाल पाहता येईल.

August 22, 2024 7:17 PM

जालना जिल्ह्यात दोन वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात आज वेगवेगळया ठिकाणी झालेल्या दोन अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. समृध्दी महामार्गावर पांगरी शिवारात आज पहाटे भरधाव पीकअप समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. पीकअप वाहन नाशिकहून फळफ्रुट घेऊन अमरावतीकडे जात होते, असं पोलीसांनी सांगितलं.  दरम्यान, जालना जि...

August 22, 2024 7:55 PM

राज्याच्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी इक्बाल सिंह चहल

मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांची राज्याच्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी बदली करण्यात आली आहे. चहल यांनी सध्याच्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्वरीत स्वीकारण्याचे निर्देश नियुक्ती संदर्भातल्या आ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.