प्रादेशिक बातम्या

August 24, 2024 6:35 PM

जालना इथं गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटात 22 कामगार जखमी

जालना इथं गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटातल्या तीन गंभीर जखमी कामगारांना छत्रपती संभाजीनगर इथं हलवलं आहे. या अपघातात एकूण 22 कामगार जखमी झाले असून इतरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

August 24, 2024 4:07 PM

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. ५ सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून ८ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत, ११ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यापासून १३ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत तर १७ सप्टेंबरल...

August 24, 2024 7:19 PM

महिलांवरच्या अत्याचाराच्या मुद्द्यावरुन राजकारण न करण्याचं भाजपाचं आवाहन

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आज राज्यात जागर जाणिवेचा हे अभियान राबवलं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत इथं झालेल्या आंदोलनात अत्याचाराच्या घटनेचा निषेध केला. या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यात कुणीही राजकारण करू नये असं बावनक...

August 24, 2024 8:46 AM

अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये – हवामान खात्याचा इशारा

अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे आज मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातील मच्छीमारीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली असताना वादळ सदृश्य वात...

August 23, 2024 7:25 PM

रत्नागिरीतल्या ३११ गावांचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात समावेश

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राबद्द्लची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधल्या ३११ गावांचा समावेश आहे. या अहवालानुसार चिपळूणमधल्या ४४, खेडमधल्या ८५, खेडमधल्या २५, लांजा तालुक्यातल्या ५०, राजापूरमधल्या ५१ आणि संग...

August 23, 2024 7:22 PM

मुंबईत राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईत राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आज केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते झालं. राज्याचे कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संस्थेने काही सामंजस्य करारही केले.  राष्ट्रीय कौशल्य प...

August 24, 2024 10:15 AM

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाकडून मनाई

महाराष्ट्रात, बदलापूर इथं लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती; मात्र यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं काल एका सुनावणी याचिकेवर मनाई केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणी न्यायाल...

August 23, 2024 7:03 PM

बंदबाबत न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री

बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला राज्यव्यापी बंद मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला आहे. यासंदर्भात न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये बातमीदाराशी बोलताना त्यांनी सांगितलं, की बदलापूरची घटना...

August 23, 2024 6:56 PM

लाडकी बहीण योजनेसह सुरक्षित बहीण योजनाही राबवण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी लाडकी बहिण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहिण योजनाही राबवली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते नाशिकमधे  महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आयोजित महिला महाशिबीरात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही लाडकी बहीण योजना चालू राहील, तसंच ऑगस्ट ...

August 23, 2024 7:56 PM

भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पुढे नेण्यात मुंबईची भूमिका मोठी – केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल

भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पुढे नेण्यात मुंबईची भूमिका मोठी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय बंदरं, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत केलं. मुंबई बंदर प्राधिकरणाचे विविध प्रकल्पांचं उद्घाटन सोनोवाल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे प्रकल्प आणि सामंजस्य करार मुं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.