प्रादेशिक बातम्या

August 25, 2024 10:40 AM

नेपाळ बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह जळगावात दाखल

नेपाळ इथल्या बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह काल जळगावच्या विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानानं आणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर ते नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुल...

August 24, 2024 8:10 PM

विधानसभा निवडणुकीत मनसे २५० जागा  लढवणार

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २५० जागा  लढवणार असल्याचं पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. नागपुरातील रवि भवन इथं  आज, ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जनता आपल्यासोबत असून मनसेला निवडणुकीत चांगले यश मिळेल असा दावा ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठीची आपली धोरणं त्या...

August 24, 2024 7:37 PM

येत्या २४ तासांत रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता

येत्या २४ तासांत रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसह कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ...

August 24, 2024 7:33 PM

मुलांना सर्वोत्तम कौशल्य तसंच भवितव्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत – केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

मुलांना सर्वोत्तम कौशल्य तसंच भवितव्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी इथं पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत ...

August 24, 2024 7:30 PM

राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय

राज्यातल्या बहुतांश भागात आज पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे एसटी बस अडकून पडल्या आहेत. दरम्यान कर्ली आणि तेरेखोल नदी इशारा पातळी जवळून वाहत होत्या.  जालना शहरासह घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा, कंडारी, आंतरवाली टेंभी, रामसगाव...

August 24, 2024 7:29 PM

पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं

पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात हेलिकॉप्टर चालकासह तीन जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे असून ते मुंबईहून हैदराबाद इथं जात होते. पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून कमी दृश्यमानतेमुळे की अन्य कारणामुळे हा अपघात झाला हे अद्याप समजू शकलेले ...

August 24, 2024 7:41 PM

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच मोठा भाऊ असेल – जितेंद्र आव्हाड

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच मोठा भाऊ असेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मुंबईत महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. बदलापूरसह संपूर्ण राज्यातून समोर येणाऱ्या बलात्कार किं...

August 24, 2024 7:13 PM

शेवटच्या महिलेचा अर्ज येईपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी सुरू राहणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यातल्या शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत योजनेसाठी नोंदणी सुरूच राहील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यवतमाळ इथं लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात ते बोलत होते. या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली असून एक कोटी सात लाख लाभार्थ्यांच्या खात्यात...

August 24, 2024 7:02 PM

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारच्या राजीनाम्याची आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधकांची मागणी

  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या मुद्द्यावर पुकारलेला बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज केवळ निदर्शनं करण्याचा निर्णय मविआने घेतला.     ठाण्यात काँग्रेसचे प्र...

August 24, 2024 6:54 PM

परभणीतल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक वीम्याचे पैसे आठवडाभरात देण्याचे केंद्र सरकारचे आदेश

परभणी जिल्ह्यातल्या जवळपास दोन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पिकविमा दाव्याचे प्रलंबित असलेले दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुयपे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने संबंधित पीक विमा कंपनीला प्रलंबित रक्कम एका आठवड्यात शेतकऱ्यांना देण्याचे आदेश आज दिले.  केंद्रीय कृषी म...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.