प्रादेशिक बातम्या

August 26, 2024 3:48 PM

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचाच्या कुटुंबाचं आत्मदहनाचा प्रयत्न

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एका सरपंचाच्या  कुटुंबानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. गेवराई तालुक्यातल्या रेवकी देवकी ग्रामपंचायती अंतर्गत केलेल्या कामांची ९६ लाखांची देयकं प्रशासनाने रोखली. याची दाद मागण्यासाठी सरपंच शशिकला मस्के यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या अन्य दोघांनी अंगावर डिझेल ओतून जाळून...

August 26, 2024 3:46 PM

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना

मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशा सूचना, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या तांत्रिक सल्लागारांनी, संबधित विभागाला दिल्या आहेत. मुंबई-गोवा राज्य महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत  खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन ग...

August 27, 2024 8:44 AM

राज्यभरातल्या बाजार समित्यांचा एकदिवसीय बंद मागे

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीनं उद्या पुकारलेला एकदिवसीय बंद मागे घेण्यात आला आहे. मुंबई सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाली. व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून एका महिन्यात या समितीचा अहवाल घेण्याच्...

August 26, 2024 7:28 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैद्राबादमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी अकरा वाजता नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं त...

August 26, 2024 8:47 AM

जालना औद्योगिक वसाहतीमधील स्टील कारखान्यात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू

जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील कारखान्यात झालेल्या स्फोटात जखमी एका कामगाराचा काल छत्रपती संभाजीनगर इथ उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य तीन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या कंपनी मालकासह इतर दोघांना न्यायालयानं का...

August 26, 2024 8:43 AM

परभणी : चालू आर्थिक वर्षासाठी ४७० कोटी ३७ लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता

परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी ४७० कोटी ३७ लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली, त्यात ही मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेली कामं विहित कालमर्यादेत आणि दर्जेदार ह...

August 26, 2024 8:38 AM

राज्यात सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचं आदित्य ठाकरे यांचं आवाहन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौर्यावर असून, काल त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने प्रयत्न करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बरोजगारी, महिला सुरक्षा यावरुन त्यांनी सरकारवर टीका केली. आ...

August 26, 2024 9:44 AM

सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

केंद्र सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करायला राज्य मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. मार्च २०२४ पासूनच याची अंमलबजावणी होणार अस...

August 25, 2024 7:07 PM

पुढचे दोन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस

पुढचे दोन दिवस कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याच...

August 25, 2024 6:22 PM

पुण्यातून कोकणात जाण्यासाठी विमानसेवा सुरू

पुण्यातून कोकणात जाण्यासाठी ३१ ऑगस्ट पासून विमानसेवा सुरू होत आहे. पुणे ते गोवा आणि पुणे ते सिंधुदुर्ग या दोन्ही मार्गांवर थेट विमानसेवा सुरू होत आहे. एका खासगी विमान कंपनीकडून शनिवार आणि रविवारी ही विमानसेवा सुरू असेल. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.