प्रादेशिक बातम्या

August 27, 2024 8:34 PM

रत्नागिरीत परिचारिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपासाकरता SIT ची स्थापना

रत्नागिरी इथं एका प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या पथकात महिला निरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी असून त्यात तांत्रिक/वैज्ञानिक अनुभव असलेल्या कर्मचा...

August 27, 2024 6:59 PM

आशा कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू किंवा अंपगत्वाबद्दल सानुग्रह अनुदानाबाबत शासन आदेश जारी

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या कामाचं स्वरुप लक्षात घेऊन त्यांना कर्तव्य बजावताना मृत्यू आला तर १० लाख रुपये आणि कायमस्वरुपी अपंगत्व आलं तर ५ लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात राज्य शासनाने आदेश जारी केले असून १ एप्रिल २०२४ पासून हा निर्णय लागू कर...

August 27, 2024 7:16 PM

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आह...

August 27, 2024 3:48 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा विद्यापीठास समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मान्यता

कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा विद्यापीठाला समूह विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या समूह विद्यापीठात वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, या महाविद्यालयासह यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे क...

August 27, 2024 3:43 PM

छत्रपती शिवाजी महाराजांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार – दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी राज्य शासनानं भारतीय नौदलाशी समन्वय साधून १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं. त्यांनी राजक...

August 27, 2024 1:44 PM

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव रणजीत चव्हाण यांनी अग्नी दिला. नांदेडचे  पालकमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, तसंच मराठवाड्या...

August 27, 2024 1:48 PM

बदलापूर प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर

महाराष्ट्रात बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या  पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर झाला आहे. या अहवालातील निरीक्षणं तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून शिक्षण ...

August 27, 2024 9:15 AM

२०२६पर्यंत एकाच वेळी अवकाशात गगनयान आणि समुद्रात समुद्रयान सोडण्याच्या दृष्टीने नियोजन – भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन

२०२६पर्यंत एकाच वेळी अवकाशात गगनयान आणि समुद्रात समुद्रयान सोडण्याच्या दृष्टीने नियोजन आहे, अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी काल पुण्यात दिली. भारतीय समशीतोष्ण हवामान संस्थेत आयोजित एका प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हवामानाचा आणखी अचूक अ...

August 27, 2024 9:09 AM

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देण्यासाठी, राज्य शासनाने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा, असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. या संदर्भात मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ...

August 27, 2024 10:29 AM

जायकवाडी धरणाची पाणीपातळी पोहोचली ५३ टक्क्यांवर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ५३ पूर्णांक ४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ७१ हजार ११५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. दरम्यान, गेले दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण गावातली सर्व शेती पाण्याख...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.