प्रादेशिक बातम्या

August 29, 2024 7:19 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचं आज ‘आत्मक्लेश’ मूक आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथं राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मुंबईत 'आत्मक्लेश' मूक आंदोलन करण्यात आलं. चेंबूर इथं छत्रपती शिवाजी महाराज...

August 29, 2024 8:19 PM

‘महाराष्ट्र’ जीडीपीत सर्वाधिक वाटा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्र हे देशाचं विकास इंजिन असून गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचा जीडीपीतला वाटा सर्वाधिक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. आपलं सरकार रात्रंदिवस काम करत असून घरात बसून सरकार चालवता नाही येत, त्यासाठी जनतेशी संपर्कात राहि...

August 29, 2024 3:57 PM

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी झालेल्या संघर्षात ४२ जणांवर गुन्हा दाखल

मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ काल आयोजित निषेध मोर्चाच्यावेळी दोन गटांमधे झालेल्या संघर्ष प्रकरणी ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या या संघर्षात किल्ल्याच्या...

August 29, 2024 3:42 PM

सांगलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘नव्या भारताचे नवीन कायदे’ विषयावर चित्र प्रदर्शनाचं आयोजन

सांगलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात केंद्रीय संचार ब्युरो आणि सांगली पोलीस यांच्यातर्फे नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर आधारित चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. अत्यंत चांगल्या पद्धतीनं मराठी भाषेत कायद्यांविषयी माहिती दिली असून तिन्ही कायदे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या असल्याचं या कार्यक्र...

August 29, 2024 3:28 PM

राज्यात कणा नसलेले सरकार असल्याची जयंत पाटील यांची टीका

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या केल्याच्या घटनेवरून राज्यात कणा नसलेले सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. राज्यातल्या महिला, मुली, सामान्य नागरिक सुरक्षित नव्हते...

August 29, 2024 3:24 PM

नाशिकमधल्या सर्व मतदान यंत्रांची देखभाल दुरुस्ती तपासणी चाचणी पूर्ण

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नाशिकमधल्या सर्व मतदान यंत्रांची देखभाल दुरुस्ती तपासणी चाचणी पूर्ण झाली आहे. अकरा मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे तसंच तज्ञ अभियंते उपस्थित होेते. ही यंत्रं सुस्थि...

August 29, 2024 7:12 PM

शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी कुणालाही माफी नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याप्रकरणी कुणालाही माफी नाही, कारवाई होणारच, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत बोलत होते. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्र...

August 29, 2024 7:19 PM

मुंबईच्या वांद्रे टर्मिनसपासून मडगावला जाणाऱ्या नव्या एक्सप्रेस गाडीचं उद्घाटन

मुंबईच्या वांद्रे टर्मिनस पासून मडगावला जाणारी नवी एक्सप्रेस गाडी आजपासून सुरू झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून ही गाडी रवाना केली. या कार्यक्रमाला रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. गणेशोत्सवासा...

August 29, 2024 7:14 PM

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त तंत्रज्ञ समिती नेमण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

सिंधुदुर्ग जिल्हात मालवण इथं राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणं शोधण्यासाठी तसंच एकूणच या घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी संयुक्त तंत्रज्ञ समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या समितीत बांधकाम अभियंते, आयआयटी मुंबईचे प्रतिनि...

August 28, 2024 6:51 PM

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं नगरपरिषदेनं उभारलेल्या बुद्ध विहाराचं येत्या ४ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उद्घाटन

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं नगरपरिषदेनं उभारलेल्या बुद्ध विहाराचं उद्घाटन येत्या ४ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. उदगीरमधे तळवेस इथं बुध्द विहाराचं बांधकाम केलं आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गी इथल्या बुध्द विहाराची ही प्रतिकृती आहे. उद्घाटन समारंभाला राज्यपाल सी. पी. राध...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.