प्रादेशिक बातम्या

September 1, 2024 3:29 PM

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचा दर

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली. याआधी गेल्या महिन्यात ८ रुपये ५० पैशांनी एलपीजी गॅसच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या, तर जुलैमध्ये गॅस सिलिंडरचे दर ३० रुपयांनी कमी झाले होते.

September 1, 2024 3:18 PM

हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू

हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्यात विविध मुद्यांवरून सुरू असलेली आंदोलनं, राजकीय सभा यांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जमावबंदीचे आदेश १२ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. 

September 1, 2024 3:06 PM

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना पराभव दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे परिस्थिती बदलली असल्याचा दावा त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं आंदोलन पूर्णपणे र...

September 1, 2024 3:46 PM

पोलीस पाटलांच्या थकित मानधनाचा प्रश्न मार्गी लागणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातल्या पोलीस पाटलांच्या गेल्या ४ महिन्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्या शासननिर्णय निर्गमित करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पोलीस पाटील संघाच्या ८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते आज नागपूर इथं बोलत होते. पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचं वय...

August 31, 2024 7:40 PM

रत्नागिरीत सायन्स गॅलरीचं लोकार्पण

रत्नागिरी शहरातल्या बाळासाहेब ठाकरे तारांगणात उभारण्यात आलेल्या सायन्स गॅलरीच लोकार्पण आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्याचप्रमाणे त्यांच्या चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन मिळावं, या दृष्टीनं या गॅलरीची उभारण...

August 31, 2024 7:35 PM

राजस्थान मल्टीस्टेट बँकेचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुणे इथून अटक

राजस्थान मल्टीस्टेट बँकेचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुणे इथून अटक करण्यात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. अनेक दिवसांपासून या प्रकरणातील आरोपी असलेलं बियाणी कुटुंबिय पोलिसांना गुंगारा देत होतं. अखेर आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. अभिषेक बियाणी याला आता बीडला घेऊन जाणार असून ठेवीदारा...

August 31, 2024 7:26 PM

द्राक्ष बेदाण्याला कृषिमाल म्हणून मान्यता मिळण्यासाठी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाण्याला कृषिमाल म्हणून मान्यता मिळण्यासाठी नाबार्डसह अन्य संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत ठरलं. बेदाण्यावरचा पाच टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्रीय जीएसटी परिषदेला प...

August 31, 2024 7:46 PM

तरुण पिढीनं आपली प्रतिभा, नवनिर्मिती आणि क्षमता, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वापरण्याची गरज – केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

तरुण पिढीनं आपली प्रतिभा, नवनिर्मिती आणि क्षमता, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वापरण्याची गरज आहे, असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत 'आयडियाज फॉर लाईफ' या मोहिमेसंबंधीच्या कार्यक्रमात आज ते बोलत होते. २०२१मध्य...

August 31, 2024 7:01 PM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून नागपूरात सुरुवात

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आज नागपूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरूवात झाली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले असून १ हजार ५६२ कोटींहून अधिक रुपये वितरित झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांग...

August 31, 2024 6:57 PM

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात साडे ९ कोटींहून अधिक मतदार

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात साडे ९ कोटींहून अधिक मतदार आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं काल अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार राज्यात ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ मतदार आहेत. ६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप यादीच्या तुलनेत राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.