प्रादेशिक बातम्या

September 5, 2024 5:09 PM

शिवरायांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी मूर्तीकार आणि सल्लागार यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मालवणमधला शिवाजी पुतळा कोसळल्याप्रकरणी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना मालवण न्यायालयानं १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जयदीप आपटे याला काल रात्री अटक झाली होती तर चेतन पाटील गेल्या ६ दिवसांपासून पोलीस कोठडीत होता.

September 5, 2024 3:45 PM

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका सज्ज

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगमन आणि विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. चौपाटयांसह गणेश विसर्जन स्‍थळे, कृत्रिम तलाव या ठिकाणी पालिकेच्या वतीने सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यंदा ६९ नैसर्गिक स्थळांबरोबरच २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्...

September 5, 2024 3:41 PM

नंदुरबार शहरात विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याप्रकरणी मूक मोर्चा

नंदुरबार शहरातल्या एक शाळेत पाचवीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्या प्रकरणी आज सकल मराठा समाजाच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला. गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटत आहेत. या प्रकरणी पोलीसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी कोठडीत झाली आहे. मात्र यात शाळा मुख्याध्यापक आ...

September 5, 2024 3:46 PM

शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस – मुख्यमंत्री

शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आयोजित क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते. खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढायला शिकवणाऱ्य...

September 5, 2024 3:18 PM

जातीव्यवस्था कायम राखण्याचा भाजपाचा उद्देश असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

जातीव्यवस्था कायम राखण्याचा भाजपाचा उद्देश असल्याचा आरोप लोकसभेतले विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं आणि पुतळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकर्जू...

September 5, 2024 1:16 PM

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून पंढरपूरच्या आरोग्य शिबिराची नोंद

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू झालेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या शिबिराचा लाभ यंदा आषाढी वारी करणाऱ्या १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांनी घेतला. त्यामुळे या आरोग्य शिबिराची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समधे झाली आहे. या शिबिराची संकल्पना राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तान...

September 5, 2024 12:58 PM

राज्याला केंद्रिय कृषी मंत्रालयाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार

केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच 2022-23 या वर्षासाठी राज्याला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीत झालेल्या समारंभात केंद्रिय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्...

September 5, 2024 9:51 AM

महिलेवरील अत्याचारासाठी फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपतींना विनंती

महिला आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातल्या गुन्ह्यांसाठी ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे. डॉक्टर गोऱ्हे यांनी काल म...

September 5, 2024 9:27 AM

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, संप मागे

राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काल एसटी कर्मचारी कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणाऱ्या विश्रामगृहांची दुरव...

September 5, 2024 9:37 AM

अतिवृष्टीग्रस्त भागात पंचमाने न करता नियमानुसार आर्थिक मदतीची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी शेतीपिकाच्या नुकसानाचे पंचमाने न करता, अतिवृष्टीच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. काल बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही घोषना केल्याचं आमचे वार्ताहरने कळवलं आहे. दरम्यान, परभ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.