प्रादेशिक बातम्या

September 5, 2024 8:15 PM

३५ रुपये किलोच्या अनुदानित दरानं कांद्याची विक्री सुरू

केंद्र सरकारनं ३५ रुपये किलोच्या अनुदानित दरानं कांद्याची विक्री आजपासून सुरु केली. दिल्लीत राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात, तसंच मुृंबईत लोअर परळ, आणि मालाड, इथं राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ, ई कॉर्मस मंच तसंच केंद्रीय भंडार आणि सफलच्या विक्री केंद्रांवर आणि व्हॅनद्वारे फिर...

September 5, 2024 7:26 PM

राज्यातल्या विविध देवस्थानांच्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मंजुरी

राज्यातल्या विविध देवस्थानांच्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचं औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भ...

September 5, 2024 7:22 PM

महाविकास आघाडी राज्यात मजबूत असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं स्पष्टीकरण

राज्यात महाविकास आघाडी मजबूत आहे, ती कुणीही हलवू शकत नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील वांगी इथं माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या 'लोकतीर्थ' या स्मारकाचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभात बोलत होते. राज्यातलं भाजपा युती सरक...

September 5, 2024 8:29 PM

२९ हजार रोजगार निर्माण करणाऱ्या ४ औद्योगिक प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी

राज्यात १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या, उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्माण होणार आहेत....

September 5, 2024 8:30 PM

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३०७ कोटी रुपयांचा निधी द्यायला मान्यता

नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून ३०७ कोटी रुपयांचा निधी वितरीत करायला राज्यशासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासननिर्णयही आज जारी केला आहे. शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीस...

September 5, 2024 7:06 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातल्या १०९ शिक्षकांचा गौरव

विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखवण्यात शिक्षकांचं समर्पण, मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वाचं असून त्यांच्यात जग बदलण्याची ताकद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार विजेत्या शिक्षकांना आज मुंबईत मान्यवरांच्या हस्ते गौ...

September 5, 2024 7:54 PM

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १२१ % पाऊस, १०२ % क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

यंदा राज्यात १२१ टक्के पाऊस झाला आहे. तसंच राज्यात १०२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात २०१८ नंतर पहिल्यांदाच मोठी धरणं शंभर टक्के भरली असल्याची माहिती आज मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही बैठक झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्...

September 5, 2024 7:00 PM

मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना कार्यान्वित

भारतीय रेल्वेला अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल म्हणून लातूर मधला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित झाला आहे. भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याच्या रेल्वे विकास मंडळाच्या वचनबद्धतेचं हे द्योतक आहे. या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२०...

September 5, 2024 6:57 PM

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना आरक्षण

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना आरक्षित आसन यापुढं कायमस्वरूपी दिलं आहे. ते कोणत्याही थांब्यावरून बसमधे आले तर त्यांना त्यांचं आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे.

September 5, 2024 6:54 PM

मुंबईत तालुकास्तरावरच्या ३०४ कामगार सुविधा केंद्रांचं उद्घाटन

तालुकास्तरावरच्या ३०४ कामगार सुविधा केंद्रांचं उद्घाटन आज मुंबईत झालं. या सेतु केंद्राद्वारे बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ वाटपाचे अर्ज तसंच मूळ कागदपत्रं सादर करता येतील. त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठीही हे केंद्र मदत करणार आहे. मंडळानं आतापर्यंत जिल्हास्तरावर ४२ कामगार सुविधा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.