प्रादेशिक बातम्या

June 17, 2024 3:28 PM

एसटी महामंडळ ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम राबवणार

एसटी महामंडळाकडून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही मोहीम १८ जूनपासून राबवली जाणार आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना एसटी बसचे पास आता थेट शाळेत मिळणार आहेत. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक माधव कुसेकर यांनी यासंदर्भात स्थानिक एसटी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसंच शाळा, महाविद्यालयां...

June 16, 2024 3:26 PM

राज्यशासन अधिकारी महासंघाच्या मागण्यांबद्दल राज्यशासन सकारात्मक – एकनाथ शिंदे

  राज्यशासन अधिकारी महासंघाच्या मागण्यांबद्दल राज्यशासन सकारात्मक असून त्याबद्दल लवकर निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती अधिकारी महासंघाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.   सेवानिवृत्तीचं वय साठ वर्षे करावं, केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्त्यात वाढ, अतिर...

June 15, 2024 7:23 PM

उन्हाळी सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा पुन्हा सुरू

उन्हाळी सुट्टीनंतर आज राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा पुन्हा सुरू, विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांचं स्वागत उन्हाळी सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा मुलांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. मुंबईत व...

June 15, 2024 3:20 PM

वडाळ्यात इमारतीची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

मुंबई उपनगरात वडाळा इथं काल एका तीन मजली इमारतीची भिंत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं बचावकार्य सुरु केलं. या दुर्घटनेत जखमी झालेल्या या दोन महिलांना शीव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 

June 15, 2024 10:51 AM

साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची मागणी

साखर कारखान्यांकडून घेतल्या जाणाऱ्या घाऊक साखरेच्या, किमान विक्री दरात ३१ वरून ४१ रुपये प्रतिकिलो पर्यंत वाढ करण्याची मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं केंद्र सरकारकडे केली आहे. महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साखर उद्योगासंदर्भात महासं...

June 15, 2024 10:07 AM

उन्हाळी सुट्यानंतर शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ

उन्हाळी सुट्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तयारी केली आहे. जिल्ह्यातल्या महानगरपालिकेच्या सर्व शाळा, बालवाड्या, १६ जिल्हा परिषदेच्या शाळ...

June 15, 2024 9:13 AM

कृषी निविष्ठांच्या कृत्रिम टंचाई प्रकरणी धडक कारवाई

राज्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई भासवली जात असून, या प्रकरणी धडक कारवाई केली जात असल्याचं, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. ते काल बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचा कुठेही तुटवडा भासू देणार नाही, याबाबत शासन स्तरावर कृती दल नेमून नियोजन करण्यात...

June 15, 2024 1:21 PM

आषाढी वारीत सहभागी दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या  बैठकीत ते बोलत होते.   वारकऱ्यांस...

June 14, 2024 7:53 PM

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै दरम्यान

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. या अधिवेशनात २८ जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाचं कामकाज १३ दिवस चालणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विध...

June 14, 2024 7:23 PM

नीट ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींच्या हिताला धक्का पोहोचणार नाही – धर्मेंद्र प्रधान

नीट ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीच्या हिताला धक्का पोहोचणार नाही याची काळजी केंद्र सरकार घेईल, असं आश्वासन आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलं. विद्यार्थ्यांच्या समस्या समभावाने आणि सुयोग्य पद्धतीने सोडवू असं ते म्हणाले. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून सर्वोच्च न्यायालयाच्या न...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.