प्रादेशिक बातम्या

June 24, 2024 6:41 PM

धुळ्यात चिमठाणे, दुसाणे मंडळात ढगफुटी

धुळे जिल्ह्यात काल रात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. चिमठाणे तसेच दुसाने मंडळातल्या दराणे, दुसाने, एैंचाळे, हत्ती, चिमठाणे इत्यादी गावांना ढगफुटीसारख्या पावसानं मोठा तडाखा दिला. दराणे, रोहाणे गावातून वाहणार्‍या पाटली नाल्याला मोठा पूर आला. काठावरची शेती तसंच शेतकर्‍यांच्या...

June 24, 2024 6:35 PM

राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं – नाना पटोले

राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं, आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. तेलंगणात काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांचं सरसकट २ लाख रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. त्याप्रमाणे येत्या २७...

June 24, 2024 3:13 PM

राज्याच्या आदिवासी विकास विभागातल्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया स्थगित

राज्याच्या आदिवासी विकास विभागातल्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागानं गेल्या २३ नोव्हेंबर रोजी ६०२ रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास संवर्गांचा जाहिरातीत समावेश नसल्यानं ही जाहिरात रद्द करण्यात आली...

June 24, 2024 1:01 PM

लोणेरे श्रीवर्धन मार्गावर कार अपघातात ३ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर काल संध्याकाळी एक भरधाव कार झाडाला आदळून उलटल्यानंतर त्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. अन्य दुर्घटनेत अलिबाग तालुक्यातील मुनवली इथं तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला...

June 24, 2024 11:20 AM

‘मधुमित्र’ पुरस्कारासाठी अंबड गावातील राजू कानवडे यांची निवड

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या यंदाच्या 'मधुमित्र' पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या अंबड गावातील शेतकरी राजू कानवडे यांची निवड झाली आहे. मधमाशापालन हा व्यवसाय निसर्ग संवर्धनासाठी आणि शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असून मधमाशांची भुमिका महत...

June 24, 2024 10:57 AM

पुण्यातील पबमध्ये अमली पदार्थ विक्रीसंदर्भात ५ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एक अल्पवयीन मुलगा अमली पदार्थांचं सेवन करत असतानाचा व्हिडिओ समाज मध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पुणे पोलिसांनी काल संबंधित हॉटेलवर कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने ५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान ही अत्यंत गंभीर...

June 23, 2024 7:46 PM

येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे,   वाश...

June 23, 2024 7:36 PM

खेळांमध्ये मुला-मुलींना समान संधी देण्यास प्राधान्य – क्रीडामंत्री संजय बनसोडे

खेळांमध्ये मुला-मुलींना समान संधी देण्यास प्राधान्य दिलं जाईल, अशी ग्वाही राज्येच क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र क्रीडा संचालयानालयाच्या सहकार्याने पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा क्रीडा संकुलांना ...

June 23, 2024 7:21 PM

नागपूर : आशा स्वयंसेविकांना मोबाईल फोनचं वितरण

नागपूरमध्ये १३ तालुक्यातल्या आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मोबाइल फोनचं वितरण केलं. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठानच्या सौजन्यानं आशा सेविकांना मोबाईल फोन सुविधेच्या्ानाल्ीो माध्यमातून अधिक सक्षमीकरणाचा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्ग...

June 23, 2024 7:16 PM

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात क्रमांक पटकावणाऱ्या शाळा बक्षिस वितरण

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात नागपूर जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बक्षिसं देण्यात आली. देवगिरी या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशीष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ....

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.