प्रादेशिक बातम्या

June 27, 2024 8:49 AM

नाशिक शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक ९३.४८ टक्के मतदान

विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं. संध्याकाळी पाच वाजताच्या आकडेवारीनुसार मुंबई पदवीधर मतदारसंघात सरासरी ५६ टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघात ७५ टक्के आणि कोकण पदवीधर मतदारसंघात ६३ टक्के मतदान झालं. नाशिक शिक्षक मतदारसंघात ९३.४८...

June 26, 2024 8:17 PM

राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.  राज्यातल्या सर्व मुद्द्यावर सरकार विरोधकांशी चर्चा करायला तयार आहे. पण विरोधकांना केवळ जनतेची...

June 26, 2024 7:35 PM

स्टेम क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी मुंबईत ‘स्पार्क’ कार्यक्रमाचा प्रारंभ

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित, अर्थात स्टेम क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री पश्चिम विभाग आणि इंडियन विमेन नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने स्पार्क या कार्यक्रमाचा प्रारंभ आज मुंबईत करण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात हा कार्यक्रम रा...

June 26, 2024 7:30 PM

स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात चोपडा बसस्थानकाला प्रथम क्रमांक

एसटी महामंडळाने घेतलेल्या स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात 'अ' वर्गामध्ये जळगावं जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकाला प्रथम क्रमांक मिळाला असून बसस्थानकाला ५० लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.  'ब' वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या साकोली बसस्थानकाला पहिला क्रमांक आला असून बसस्थानकाला २५ लाख रुपयांचं बक्षीस मि...

June 26, 2024 7:05 PM

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६४ टक्के मतदान

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी आज मतदान झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघात ५२ पूर्णांक १८ शतांश टक्के, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ७३ पूर्णांक ३६ शतांश टक्के मतदान झालं होतं.  कोकण पदवीधर मतदारसंघात ५९ पूर्णांक ३१ शतांश टक्के, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात ७० टक्के पेक्षा जास्त मतदान झा...

June 26, 2024 7:07 PM

वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण हक्क परिषदेत आरक्षणाची १०० टक्के अंमलबजावणी करण्याची मागणी

छत्रपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीनं राज्यभरात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमातून पक्षानं दिलेले ११ ठराव मांडण्याचे आणि त्या ठरावाचे बॅनर शहरातल्या मुख्य चौकात लावण्याचे निर्देश पक्षानं दिले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी आरक्षणाची प्र...

June 26, 2024 6:26 PM

‘दरड प्रवण क्षेत्र मुक्त’ मुंबई करण्याचा राज्य सरकारचा संकल्प – मुख्यमंत्री

'दरड प्रवण क्षेत्र मुक्त' मुंबई करण्याचा राज्य सरकारचा संकल्प असून त्याची सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. त्यांनी मुंबईत असल्फा इथल्या हनुमान टेकडी परिसरात भेट देऊन तिथं सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. दरड प्रवण क्षेत्राला सुरक्षा...

June 26, 2024 3:49 PM

नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू मुळे एका रुग्णाचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू मुळे काल रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाला. या आजाराने चालू महिन्यात आत्तापर्यंत जिल्ह्यात १० लोक दगावले. काल आणखी ६ जणांना स्वाईन फ्ल्यू ची लागण झाल्याचं आढळून आलं असून यामुळे लागण झालेल्यांची संख्या ३५ इतकी झाली आहे.   पुणे जिल्ह्यात कोथरूड मधल्या एरंडवणे भागात  दोन जणा...

June 26, 2024 7:43 PM

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेनुसार मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या पत्रकारपरिषदेत विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. पावसाळी अधिवेशनात राज्यातल्या विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष आवा...

June 26, 2024 1:40 PM

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या १५०व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशेपन्नासाव्या जयंती दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन इथं  छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.