प्रादेशिक बातम्या

June 30, 2024 8:34 PM

नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल

स्वातंत्र्याच्या अमृत काळात पारित केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यास तसेच न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.   केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयातर्फे 'फौजदारी कायद्यातील सुधारणा २०२३' या विषयावर आयोजित ए...

June 30, 2024 7:48 PM

मविआ आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढतील – शरद पवार

महाविकास आघाडीतले घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवतील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात बदल होण्याची गरज आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी विरोधी आघाडीवर आहे, असं ते म्हणाले. जागावाटपाबाबतची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही, ...

June 30, 2024 8:25 PM

नव्या फौजदारी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे परिषद

ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून त्यांच्या जागी भारतीय यंत्रणेने तयार केलेले नवे, कालसुसंगत कायदे आणण्याची गरज कायदेविषयक तज्ञांनी आज विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे मुंबईत आयोजित परिषदेत अधोरेखित केली. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष्य अधिनियम...

June 30, 2024 6:40 PM

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप चव्हाण यांची निवड

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप चव्हाण यांची निवड झाली आहे. काल झालेल्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालच्या परिवर्तन पॅनेलनं सर्व १४ च्या १४ जागा जिंकल्या. कार्यवाहपदी शैलेंद्र शिर्कें, उपाध्यक्षपदी स्वाती घोसाळकर आणि राजेंद्र हुंजे, तर कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड निवडून आले. 

June 30, 2024 6:33 PM

ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांचं हृदयविकारानं निधन

नांदेड इथले ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. जोशी यांनी आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. निवृत्तीनंतर त्यांनी ब्लॉगद्वारे वेगवेगळ्या प्रश्नावर मतं मांडली. वेगवेगळ्या वृत्तपत्रातूनही ते स्तंभलेखन करत होते. कमला...

June 30, 2024 6:23 PM

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींना पुढाकार घ्यावा – मुख्य सचिव नितीन करीर

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींना पुढाकार घेण्याचं आवाहन राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी आज केलं. गिरीभ्रमणकार अविनाश जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाशिकमध्ये आयोजित सह्याद्री मित्र संमेलनात ते बोलत होते. यावेळी सातारा इथल्या प्रियांका मोहिते यांना सह्याद्री युवा रत्न तर पुण्यातल्या आ...

June 30, 2024 7:25 PM

सुजाता सौनिक राज्याच्या नव्या मुख्य सचिव

गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्या भारतीय प्रशासन सेवेच्या १९८७ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. राज्याच्या मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्...

June 30, 2024 1:56 PM

महाराष्ट्रासह गोव्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या काही भागात पुढच्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि जम्मू च्या काही भागात पुढल्या दोन ते ती...

June 30, 2024 10:07 AM

बंदीजनांना पुनर्वसनाची संधी देण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहाचा अभिनव उपक्रम

लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून ...

June 29, 2024 7:31 PM

सीबीआयनं ३२ पारपत्र अधिकारी आणि मध्यस्थ आरोपींविरोधात भ्रष्टाचाराचे १२ गुन्हे नोंदवले

सीबीआयनं ३२ पारपत्र अधिकारी आणि मध्यस्थ आरोपींविरोधात भ्रष्टाचाराचे १२ गुन्हे नोंदवले आहेत. ज्या अर्जदारांची माहिती अपुरी आहे किंवा पूर्ण दस्तऐवज नाहीत, त्यांना पारपत्र जारी करण्यासाठी भ्रष्टाचार आणि  गैरप्रकार करण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. यात  मुंबईतल्या लोअर परळ आणि मालाड इथल्या पारपत्र सेवा के...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.