प्रादेशिक बातम्या

July 8, 2024 5:47 PM

मुंबई महापालिका आपत्ती नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबईसह राज्यातली पावसाची स्थिती पाहता नागरिकांपर्यंत मदत पोहचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून सर्व यंत्रणा २४ तास दक्ष असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत हो...

July 8, 2024 4:48 PM

पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल १४ जुलैपासून सुरू

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं नवं टर्मिनल येत्या रविवारपासून म्हणजेच १४ जुलैपासून सुरू होणार आहे. सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची नियुक्ती आणि इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून उद्घाटनाचं प्रतीक म्हणून या नव्या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला रविवारी दुपारी १ वाजता बोर्डिंग पास देण्यात येणार आहे.

July 8, 2024 4:39 PM

ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा

भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम ठाणे महापालिकेच्या शुद्धीकरण केंद्रांच्या कामावर होऊन ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. पिसे आणि शहाड इथल्या शुद्धीकरण केंद्रांजवळच्या नदी पात्रात जमा झालेला गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ९, १० आणि ११ जुलै रोजी...

July 8, 2024 1:20 PM

पुणे : ‘हीट एन्ड रन’च्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोन पोलिस कॉन्स्टेबल्सचा मृत्यू

पुण्यात काल रात्री घडलेल्या हीट एन्ड रनच्या दोन वेगवेगळ्या घटनांत  दोन पोलिस कॉन्स्टेबल्सचा मृत्यू झाला असून  एक पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खालील बिटवरचे  दोन पोलिस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना पाठीमागून आलेल्या चा...

July 8, 2024 12:46 PM

पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त जलपंप उपलब्ध – मंत्री दीपक केसरकर

मुंबई शहरात सध्या फक्त कुर्ला आणि शीव या भागात पाणी साठलेलं असून  त्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईतलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या परिस्थिती काय आहे आणि ती पूर्...

July 8, 2024 1:12 PM

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सामान्य जनतेचा आहे – आमदार प्रवीण दरेकर

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, वंचित, महिला, उपेक्षितांचा अर्थसंकल्प आहे, खोट्या गोष्टी पसरवणाऱ्यांचं तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे, असं प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान केलं. शेतकरी, महिला, वारकरी, बेरोजगार या सम...

July 8, 2024 12:38 PM

मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई आणि उपनगरात साचलेलं पाणी उपसा करण्याचं काम सुरु असून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टचे आदेश दिले आहेत. मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावं आणि यंत्रणांना सहकार्य कराव असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.   &nbs...

July 8, 2024 1:36 PM

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.   मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात काल सकाळी जोरदार प...

July 7, 2024 7:57 PM

लातूर : वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक दिंडीत सहभागी

लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या विवेकानंद रुग्णालयामार्फत गेल्या १८ वर्षांपासून आषाढी वारीतल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक पायी दिंडीत सहभागी होत असतं. यावर्षीही हे पथक आजपासून १७ जुलै पर्यंत वारकऱ्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेसाठी रवाना झालं आहे. या पथकात विवेकानंद रुग्णालयाचे २ डॉक्टर, ६ ...

July 7, 2024 7:54 PM

आजपासून पंढरपुरातील श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी २४ तास खुले

पंढरपूर इथं आषाढी एकादशी आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. भाविकांना आता २६ जुलैपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचं चोवीस तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मीनिटे पदस्पर्श दर्शन घेता येईल, अशी माहिती, मंदिर प्रशासनाचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांन...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.