प्रादेशिक बातम्या

July 9, 2024 3:41 PM

राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाला जनतेकडून देणगी स्वीकारता येणार

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून देणगी स्वीकारण्याची राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षानं केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सुळे यांच्या नेतृत्वाखाल...

July 9, 2024 2:08 PM

महाराष्ट्रात पॅथॉलोजी लॅबवर नियंत्रणासाठी वेगळा कायदा करण्याचं सरकारचं आश्वासन

राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅबवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणला जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. सुनील राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. या स्वतंत्र कायद्यात दरावर नियंत्रण, कलेक्शन सेंटर नोंदणी, फौजदारी कारवाई ...

July 9, 2024 7:10 PM

मुंबईत पावसाची विश्रांती

राजधानी मुंबई आणि उपनगर क्षेत्रात पावसानं आज विश्रांती घेतली आहे.  रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या ३ दिवसांपासून  कोसळणाऱ्या पावसाचा जोर काल रात्रीपासून कमी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी असला तरी पुढचे दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. रविवारी झालेल्या अतिवृष्टीत ७१ कुट...

July 8, 2024 7:03 PM

वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शहा यांना जामीन मंजूर

मुंबईच्या वरळी भागात झालेल्या बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहा याचे वडील आणि शिवसेना नेते राजेश शहा यांना मुंबईतल्या एका न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मिहीर शहा अद्याप फरार आहे. मिहीर याने रविवारी सकाळी बीएमडब्ल्यू चालवताना एका जोडप्याच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघाता...

July 8, 2024 6:58 PM

राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस

राज्यात आज विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला.  कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. शहरात आज दुपारी पावसानं विश्रान्ती घेतली होती मात्र संध्याकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला. परिणामी पंचगंगा नदीचं पात्र फुगलं आहे. राजाराम बंधारा ३० फुटांवर असून नदीची इशारा पातळी ३९ आहे. जिल्ह्यातील ५७ बंधारे पाण्याखाली ...

July 8, 2024 6:43 PM

मुंबईत गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला सर्वाधिक पाऊस

मुंबई महानगर क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं सर्वत्र दाणादाण उडवली. सांताक्रुझ वेधशाळेत नोंद झालेला गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला हा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार आज सकाळी साडे ८ पर्यंतच्या नोंदीनुसार गेल्या २४ तासात २६७ मिलिमीटर पाऊस ...

July 8, 2024 6:53 PM

मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने विविध पावलं उचलली आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं. मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. बैठकीला मदत आणि पुनर्वसन म...

July 8, 2024 6:16 PM

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ रोखण्यासाठी कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना

मुंबईत मद्यपान करून वाहन चालवण्याची प्रकरणं थांबवण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची ठिकाणी आणि नाक्यानाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन करणारे पब्ज आणि बारवरही कारवाया कराव्यात, अशी सूचना मुंबई म...

July 8, 2024 5:55 PM

पहिल्याच पावसात युती सरकारचं पितळ उघडं पडलं – नाना पटोले

मुंबई आणि उपनगरात अनेक भागात पाणी तुडुंब भरलं असून पहिल्याच पावसात युती सरकारचं पितळ उघडं पडलं आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अपयशाचं खापर पावसावर फोडू नये असंही ते म्हणाले. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाणं अत्यंत गंभीर आहे,...

July 8, 2024 5:52 PM

सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून तब्बल १४ तासानंतर मुंबई - गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत झाली. काल या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ चं एक पथक आज सकाळी कुडाळमध्ये दाखल झालं आहे.  दरम्यान, खासदार नाराय...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.