प्रादेशिक बातम्या

July 10, 2024 6:53 PM

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भाजपतर्फे राणे यांचा रत्नागिरीत नागरी सत्कार

कोकणातील नैसर्गिक उत्पादनांच्या आधारे इथलं उद्योग वाढवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची माझी तयारी आहे. या उद्योगांबरोबरच रिफायनरीसारखे उद्योगही इथं यायला हवेत, असं प्रतिपादन रत्नागिरी-सिंधदुर्गचे  खासदार नारायण राणे यांनी केलं. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भाजपतर्फे राणे यांचा नागरी सत्कार आज रत्ना...

July 10, 2024 5:55 PM

पालघर शिवसेना उपनेते राजेश शाह यांना शिवसेनेतून काढलं

वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांना शिवसेनेतून काढून टाकलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. या दुर्घटनेत मरण पावलेल्या महिलेच्या कुटुंबाप्रति सहवेदना व्यक्त करतानाच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं. द...

July 10, 2024 3:00 PM

राज्यसरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे – विरोधी पक्षनते अंबादास दानवे

राज्यसरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप आज विधानपरिषदेत विरोधी पक्षनते अंबादास दानवे यांनी केला. नापिकी, कर्जाचा बोजा, पीक विम्यातल्या अडचणी, शेतमालाला बाजारभाव आदी समस्यांमुळे शेतकरी त्रस्त आहे. आणि सरकार केवळ मदतीच्या घोषणा करीत आहे, असं ते म्हणाले.     शेतकऱ्यांचे १० हजार २२ कोटी ६...

July 10, 2024 2:58 PM

दुधातली भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

दुधातली भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, आणि पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक निधी देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं.    केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा फायदा एक लाखांहून अधिक अधिकारी आणि कर...

July 10, 2024 1:49 PM

मराठवाडा आणि विदर्भात पहाटे भूकंपाचे धक्के

महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता साडेचार रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा गावात होता. भूकंपामुळे कोणतीही जिव...

July 10, 2024 1:37 PM

अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे विस्कळीत, अनेक गाड्या रद्द

गोव्यातल्या पेडणे इथं अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस तसंच, मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मडगावह...

July 10, 2024 3:40 PM

मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक गैरहजर राहिल्याचा मुद्दा आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडल्यावर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी हौद्यात उतरून प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी केली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्...

July 10, 2024 9:18 AM

राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणंत्री हसन मुश्रीफ

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. मराठवाड्यात हिंगोली आणि जालन्यासह राज्यात १०० विद्यार्थी क्षमतेची ही महाविद्यालयं सुरु करण्यासाठी, राष्ट्रीय वैद्यक परिषदेकडे अर्ज देण्य...

July 10, 2024 9:14 AM

राज्यसरकार कुठल्याही समाजघटकांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईत काल आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली ...

July 9, 2024 7:50 PM

views 1

सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आज मुंबईत सर्वपक्षीय मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. मात्र या प्रकरणी राज्य सरकारनं विरोधकांना विश्वासात न घेतल्यानं महाविकास आघाडी बैठकीला जाणार नाही. आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यांनी आंदोलनाला भेट देऊन काय चर्चा केली आहे हे राज्यातील जनते...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.