प्रादेशिक बातम्या

July 12, 2024 3:34 PM

औरंगाबाद प्रारूप प्रकरणी इसिसच्या दोन सदस्यांवर आरोपपत्र दाखल

औरंगाबाद प्रारूप प्रकरणी इसिसच्या दोन सदस्यांवर राष्ट्रीय तपास संस्थेनं आज आरोपपत्र दाखल केलं. दहशतवादी कारवाया प्रकरणात सहभाग, देशभरातल्या युवकांची दहशतवाद प्रकरणात सहभागी होण्यासाठी नियुक्ती करण्याचं काम त्यांच्याकडे होतं, असं यात नमूद केलं आहे. फेब्रुवारी महिन्यात यापैकी एका आरोपीला NIA नं पकडलं ...

July 12, 2024 3:28 PM

राज्याच्या वित्तव्यवस्थेचा २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांचा अहवाल विधानसभेत सादर

मूळ अर्थसंकल्पातल्या तरतुदींइतका खर्च झालेला नसताना राज्य सरकारनं पुरवणी मागण्या मांडल्या. हे प्रकार टाळण्यासाठी योग्य अर्थसंकल्पीय मार्गांचा अवलंब करायला हवा असं निरीक्षण कॅग अर्थात नियंत्रक आणि लेखापालांच्या अहवालात नोंदवलं आहे. राज्याच्या वित्तव्यवस्थेचा २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षांचा...

July 12, 2024 3:18 PM

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान सुरू

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत २४६ आमदारांनी मतदानं केलं आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यानंतर संध्याकाळी लगेच मतमोजणी होणार आहे. सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदान कशाप्रकारे करावं, पसंतीक्रम कसा ठेवा...

July 12, 2024 1:22 PM

नॉन क्रिमीलेयरची ८ लाख रुपयांची वार्षिक उत्पन्नमर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची मंत्री अतुल सावे यांची विधानसभेत माहिती

महाराष्ट्रातल्या विविध घटकांना शैक्षणिक प्रवेशासाठी असणारी नॉन क्रिमीलेयरची आठ लाख रुपयांची वार्षिक उत्पन्नमर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती इतर मागास  बहुजन कल्याण प्रवर्ग विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना संजय गायकवाड...

July 12, 2024 1:05 PM

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा आरोपी एन. गंगाधरन याच्या कोठडीत १५ जुलै पर्यंत वाढ

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कोठडीत असलेला आरोपी एन. गंगाधरन याच्या कोठडीत लातूरच्या न्यायालयानं आणखी चार दिवसांची वाढ केली आहे. त्याची कोठडी काल संपल्यानं त्याला न्यायालयात हजर केलं होतं.  दरम्यान, या प्रकरणी लातूरमध्ये गुन्हा दाखल असलेला ईरंना कोनगलवार हा अद्याप फरार असून त्याला अटक करण्य...

July 12, 2024 9:25 AM

संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी इथं आगमन झालं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचं स्वागत करून माऊलीच्या पादुकांचं दर्शन घेतलं. आज पालखी नातेपुते मुक्कामाहून पुढे मार्गस्थ होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आज तुकोबारायांच्या पादुकांना नीरा...

July 11, 2024 8:19 PM

पालघरमध्ये युरिया खताचा बेकायदेशीर साठा जप्त

पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या मणिपूर या गावातून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी युरिया खताचा बेकायदेशीर साठा जप्त केला. काल रात्री छापा टाकून युरियाची साठ पोती जप्त केली. जप्त केलेल्या युरियाचा तपासणी अहवाल आल्यानंतर हा नमुना शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या युरिया खताशी जुळला तर दोषींवर गुन्हा दाख...

July 11, 2024 7:58 PM

भटके विमुक्त समाजाला महीनाभरात दाखले द्या – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

भटक्या विमुक्त समाजातल्या नागरिकांना महिन्याभरात दाखल्यांचं वाटप करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. भटके विमुक्त समाजातील नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणींसंदर्भात विधानभवनात आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्दे...

July 11, 2024 7:55 PM

गडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

दोन महिला नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली इथं आत्मसमर्पण केलं. त्यापैकी प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजूबाई हिच्यावर ४० गुन्हे दाखल असून तिच्यावर शासनाने ८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. अखिरा संकेर पुडो उर्फ रत्नमाला या दुसऱ्या नक्षलवादी महिलेवर सात गुन्हे दाखल असून पोलिसांनी तिच्यावर आठ लाखांचं बक्ष...

July 11, 2024 7:53 PM

कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून यादरम्यान किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहिल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.  याकाळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.