राष्ट्रीय

August 13, 2024 1:11 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी घरोघरी तिरंगा बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्लीतल्या भारत मंडमप इथं घरोघरी तिरंगा बाईक रॅलीला आज सकाळी घरोघरी तिरंगा ही एक चळवळ झाली असून देशातले कोट्यवधी लोक आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावत आहेत, असं उपराष्ट्रपती म्हणाले. घरोघरी तिरंगा या मोहिमेतून स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि विकसित भारताबद्दलची देशाची वचनबद...

August 13, 2024 12:58 PM

गुंतवणूकदारांना आपत्कालीन परिस्थितीत शंभर टक्के रक्कम परत करण्याचे आरबीआयचे निर्देश

बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी आपल्या ठेवीदारांना आपत्कालीन परिस्थितीत गुंतवणुकीच्या पहिल्या ३ महिन्यांमध्ये ठेवीची १०० टक्के रक्कम परत करावी असे  निर्देश भारतीय रिझर्व बँकेनं दिले आहेत. मुदतपूर्व काढल्या गेलेल्या अशा ठेवींवर व्याज दिलं  जाणार नाही, असं रिझर्व्ह बँकेनं काल जारी केलेल्या निवेदनात म्ह...

August 13, 2024 1:05 PM

प्रसारण सेवा नियमन विधेयकाच्या मसुद्यावर अभिप्राय आणि सूचना देण्यास मुदत वाढ

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारण सेवा नियमन विधेयक २०२४ च्या मसुद्यावर अभिप्राय आणि सूचना देण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे, यावर विचारविनिमय करून कायद्याचा नवा मसुदा तयार केला जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटलं आहे. विधेयकाच्या मसुद्यावर विविध संघटनांकडून अनेक शिफारशी, अभ...

August 13, 2024 9:54 AM

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘एक भारत-एक तिकीट’

एक भारत एक तिकीट उपक्रमासाठी भारतीय रेल्वे खाद्य आणि पर्यटन महामंडळ म्हणजे आयआरसीटीसी आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश वाहतूक महामंडळ म्हणजे एनएसआरटीसी यांनी संयुक्त सहकार्य केलं आहे. त्या अंतर्गत भारतीय रेल्वे आणि नमो भारत रेल्वेंची तिकीटं बुक करता येणार आहेत. आयआरसीटीसी संकेतस्थळावरून नमो भारत तिकीटं ...

August 13, 2024 9:49 AM

राष्ट्रीय महिला आयोगाचं दोन सदस्यांचं पथक कोलकत्यात दाखल

राष्ट्रीय महिला आयोगाचं दोन सदस्यांचं पथक कोलकत्यात दाखल झालं आहे. कोलकत्यातल्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्लयातील महिला डॉक्टरवर कथित अत्याचार आणि खून प्रकरणी हे पथक चौकशी करत आहे. काल या पथकानं पोलिस आयुक्तांची भेट घेतली. आज ते रुणालयाला भेट देणार असून आपला अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाला सादर करणा...

August 13, 2024 1:07 PM

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना

खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी आपत्ती किंवा दुर्घटनांची दृश्यं दाखवताना त्यावर घटना घडलेल्या तारखेचा उल्लेख करण्याच्या मार्गदर्शक सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटना घडल्यानंतर वाहिन्यांवर अनेक दिवस बातम्या प्रसारित केल्या जातात, मात्र त्यात घटना झाल...

August 12, 2024 8:16 PM

तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानात पुढचे तीन दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

पुढचे तीन दिवस तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थान याभागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि रायलसीमा या भागांतही आज मुसळधार पाऊस पडेल. तसंच, हिमालयाच्या पश्चिमेकडचा प्रदेश तसंच पूर्व आणि ईश...

August 12, 2024 8:09 PM

श्रीनगरमध्ये तिरंगा यात्रेसह तिरंगा स्वाक्षरी मोहीमचं उद्घाटन

जम्मू-काश्मीर  मधल्या श्रीनगर मध्ये  तिरंगा यात्रेसह तिरंगा स्वाक्षरी मोहीम सुरु झाली आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज या यात्रेसह स्वाक्षरी मोहीमेचं उद्घाटन केलं. हजारो नागरिकांचा समावेश असलेल्या तिरंगा यात्रेत सिन्हा स्वतः सहभागी झाले होते. जम्मू काश्मीरमधल्या  हर घर तिरंगा ...

August 12, 2024 7:58 PM

प्रधानमंत्री- सूर्य घर- मोफत वीज योजनेंतर्गत आदर्श सौर गावांच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्र सरकारचे निर्देश जारी

प्रधानमंत्री-सूर्य घर-मोफत वीज योजनेंतर्गत आदर्श सौर गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी  केंद्र सरकारनं निर्देश जारी केले आहेत. या योजनेंतर्गत देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं ५ हजाराहून अधिक लोकसंख्येचं एकेक गाव आदर्श सौर ग्राम म्हणून विकसित केलं जाणार आहे. विशेष दर्जा प्राप्त असलेल्या...

August 12, 2024 7:52 PM

गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर ३ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यापर्यंत खाली

या वर्षीच्या जुलै महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर ३ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यापर्यंत खाली आला. गेल्या ५९ महिन्यांतला हा सर्वात कमी दर आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, भाजीपाला, फळं आणि मसाल्यांचे दर घसरल्यामुळं गेल्या मह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.