राष्ट्रीय

August 15, 2024 8:19 PM

जगभरात अनेक ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा

जगभरात अनेक ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय समुदायानं आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. अबु धाबीमध्ये राजदूत संजय सुधीर यांच्या हस्ते दूतावासात भारतीय ध्वजारोहण झालं. आपल्या भाषणात त्यांनी भारताची उल्लेखनीय प्रगती आणि संयु...

August 15, 2024 7:56 PM

मासिक पाळीच्या काळात महिलांना एक दिवस रजा, ‘या’ राज्याचा निर्णय

ओडिशामध्ये नोकरदार महिलांना मासिक पाळीच्या काळात एक दिवस रजा देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी आज जाहीर केला. सरकारी आणि खासगी नोकरीत असणाऱ्या महिलांना ही रजा मिळणार आहे. बिहार आणि केरळ या राज्यांमध्ये अनुक्रमे दोन आणि तीन दिवसांची सुट्टी देण्यात येते.

August 15, 2024 7:50 PM

आसाममध्ये सुरक्षा दलाकडून शोध मोहिम सुरू

बंदी घालण्यात आलेल्या उल्फा या अतिरेकी संघटनेनं २४ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्यानंतर आसाममध्ये सुरक्षा दलांनी विविध ठिकाणी शोध मोहिम राबवली. राज्यातून कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही. गुवाहाटीमध्ये काही ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्या असून न्याय वैद्यक चाचणीसाठी त्या पाठवल्याची माहिती पोलीस...

August 15, 2024 7:50 PM

मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं उद्घाटन

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं NPSS अर्थात राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं उद्घाटन केलं. NPPS द्वारे शेतकरी विविध प्रकारच्या कीटकनाशकांची माहिती घेऊन आपल्या पिकांचं संभाव्य नुकसान टाळू शकतील असं चौहान यांनी यावेळी सांगितलं.   यावेळी त्यांनी के...

August 15, 2024 8:00 PM

पारशी नववर्ष नवरोजनिमित्त राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

देशभरात आज नवरोज उत्साहात साजरा केला जात आहे. पारशी बांधवानी अग्यारीत जाऊन या निमित्त प्रार्थना केली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पारशी नववर्ष, नवरोजनिमित्त सर्व नागरिकांना, विशेषत: पारशी समाजातल्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवरोज हे आनंद, उत्साह आणि व...

August 15, 2024 7:37 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीच्या नेत्यांचे मानले आभार

स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक जागतिक पातळीच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांच्या शुभेच्छांबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकहितासाठी एकत्र काम करण्याविषयी ...

August 15, 2024 7:34 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची घेतली भेट !

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. यात कास्य पदक विजेता भारतीय हॉकी संघ, नेमबाज मनू भाकर, स्वप्नील कुसळे, सरबज्योत सिंग, कुस्तीपटू अमन सेहरावत यांचा समावेश होता. नीरज चोप्रा उपचारांसाठी जर्मनी इथं गेल्यामुळे तो या भेटीवेळी अनुपस्थित होता.

August 15, 2024 7:00 PM

समान नागरी कायद्यावर देशात व्यापक चर्चेची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त

देशातले १४० कोटी नागरिक एकजुटीने वागले तर, प्रत्येक आव्हानावर मात करत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्राचं स्वप्न साकार होऊ शकेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग ११व्यांदा मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला, त्यानंतर ते देशाला संबोधित करत होते. विकसित भारतात ...

August 15, 2024 3:40 PM

प्रधानमंत्र्यांच्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं – गृहमंत्री अमित शाह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या दहा वर्षात झालेल्या विकासातून प्रेरणा घेऊन देशाला पुढे घेऊन जाण्याची वचनबद्धता या भाषणातून दिसते...

August 15, 2024 3:37 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य दिन हा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या आदर्शांचा उत्सव असून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया आहे, असं धनखड आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सर्व नागरिकांना २०४७ पर्यंत विकसि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.