राष्ट्रीय

August 16, 2024 1:45 PM

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीदिनानिमित्त देशाची आदरांजली

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या  पुण्यतिथी निमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीतल्या 'सदैव अटल' या त्यांच्या समाधी स्थळाजवळ आज प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं.   राष्ट्रपाती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह...

August 16, 2024 1:29 PM

प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ राम नारायण अग्रवाल यांचं काल हैद्राबाद इथं निधन

प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ राम नारायण अग्रवाल यांचं काल हैद्राबाद इथं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात DRDO ने डॉ अग्रवाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.   पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, डॉ अग्रवाल यांनी भारताच्या लांब पल्ल्याच्या अग्नी क्षे...

August 16, 2024 1:26 PM

हिमाचल प्रदेशात पुराचा धोका कायम

हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर ओसरला असला तरीही पुराचा धोका कायम आहे.  भारतीय हवामान विभागानं येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेशातल्या  चंबा, कांगडा, शिमला आणि सिरमौर या चार जिल्ह्यांमध्ये पूर येण्याचा इशारा दिला आहे.   राज्यातल्या लाहौल-स्पिती आणि किन्नौर वगळता उर्वरित १० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा...

August 16, 2024 1:23 PM

SSLVD3 च्या माध्यमातून EOS – 08 या पृथ्वी निरीक्षक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एस आर ओ- डेमो सॅट प्रवासी उपग्रह आज सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्याची माहिती, इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी दिली . एसएसएलव्हीचं हे तिसरं प्रक्षेपण आहे. याबरोबरंच भारत,  सूक्ष्म, ल...

August 16, 2024 1:20 PM

राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान सर्वसामान्यांसाठी खुलं

राष्ट्रपती भवनातलं अमृत ​​उद्यान आज सर्वसामान्यांसाठी खुलं झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या बुधवारी अमृत उद्यान उन्हाळी वार्षिक 2024 चं उद्घाटन केलं. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी हे  उद्यान खुलं राहणार आहे. येत्या 29 तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमृत उद्यानात नामवंत खेळा...

August 16, 2024 1:13 PM

कोलकाता अत्याचार निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनची एक दिवसाच्या देशव्यापी संपाची घोषणा

  कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा निषेध देशभरात विविध प्रकारे नोंदवण्यात येत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनं उद्या एक दिवसाचा संप पुकारला असून, या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील असं सांगितलं आहे. या दुर्घटनेनंतर कोलकाता रुग्णालयात झालेल्या तोडफोडीचाही इंडि...

August 16, 2024 1:11 PM

भारत व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर संमेलनाचं यजमानपद भूषावणार

  भारत उद्यापासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर संमेलनाचं यजमानपद भूषावणार आहे. शाश्वत भविष्यासाठी सक्षम ग्लोबल साऊथ अशी या संमेलनाची संकल्पना आहे.   देशा-देशातला परस्पर संघर्ष, संमेलनात अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट, हवामान बदल यासारख्या आव्हानांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट...

August 16, 2024 10:47 AM

राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं उद्घाटन केले. या NPPS च्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कीटकनाशकांची माहिती मिळेल तसंच शेतकरी त्यांच्या हानिकारक प्रभावापासून पिकं वाचवू शकतील. अशी माहिती चौहान यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी...

August 16, 2024 10:15 AM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी धनखड हैदराबाद, मधल्या कान्हा शांती वनमला भेट देतील.   उद्या ते अक्षरा विद्यालय परिसर आणि कौशल्य विकास केंद्र, स्वर्ण भारत ट्रस्ट आणि आंध्र प्रदेशातील नेल्लोर इथल्या मु...

August 15, 2024 8:26 PM

कोलकात्यातल्या R. G. कार वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड, ९ जणांना अटक

पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यातल्या R. G. कार वैद्यकीय महाविद्यालयात काही व्यक्तींनी काल रात्री तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली असून २६ जणांची ओळख पटली आहे. महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि खून प्रकरणी सीबीआयचं पथक आज या ठिकाणी पोहोचलं. दुसरं पथक महिलेच्या घरी गेलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.