राष्ट्रीय

August 21, 2024 7:45 PM

निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या हितासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचं एम्सचं आवाहन

निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या हितासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचं आवाहन एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेनं एका पत्रकाद्वारे केलं आहे. एम्सनं आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या कोणत्याही तत्काळ समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये इतर चार सदस्यांसह रुग्णालयाचे अधि...

August 21, 2024 7:39 PM

बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय – राहुल गांधी

बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय आहे.  पश्चिम बंगाल, युपी, बिहारनंतर महाराष्ट्रातील मुली देखील आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. समाज म्हणून आपली वाटचाल कुठं होत आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे.  अल्...

August 21, 2024 7:01 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यासाठी वारसॉ इथं दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यासाठी राजधानी वारसॉ इथं दाखल झाले. वारसॉ इथल्या लष्कराच्या विमानतळावर प्रधानमंत्री मोद यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. पोलंड आणि भारतातल्या जामनगर आणि कोल्हापूर यांच्यातले ऋणानुबंध जपणाऱ्या दोन स्मृति स्थळांना प्रधानमंत्री भेट देणार आहेत. त्यानं...

August 21, 2024 8:11 PM

राष्ट्रीय अंतराळ दिवसानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन

पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस येत्या शुक्रवारी म्हणजे २३ ऑगस्टला देशात साजरा केला जाणार आहे. या दिवसानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाणार असल्याची माहिती अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नव...

August 21, 2024 8:25 PM

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात देशभरात बंद

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात देशभरात बंद पाळला जात आहे. बिहारमध्ये आरक्षण बचाव संघर्ष समितीने पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांत चकमकी झाल्या. विविध रेल्वेस्थानकांवर निदर्शनं झाल्यामुळं रेल्...

August 21, 2024 3:51 PM

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड २०२४ मध्ये ए प्लस रेटिंग

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड २०२४ मध्ये सलग दुसऱ्यांदा ए प्लस रेटिंग मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. आरबीआयनं एक्स समाज माध्यमावरील पोस्टवर प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत ...

August 21, 2024 1:38 PM

दहशतवाद आणि अतिरेकी विचारांच्या प्रसारासाठी इंटरनेटचा वापर हे गंभीर आव्हान – युरोप

दहशतवाद आणि अतिरेकी विचारांच्या प्रसारासाठी इंटरनेटचा वापर ही सध्याची गंभीर आव्हान असून त्याकरता जगातल्या सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन युरोपीयन संघाचे राजदूत हर्व डेल्फिन यांनी केलं आहे. दिल्लीत आज युरोपीयन संघ - भारत  परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक दहशतवादविरोधी मंडळ आणि...

August 21, 2024 1:25 PM

पूजा खेडकरला २९ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्रातील निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर हिला येत्या २९ ऑगस्टपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पूजा खेडकर हिला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होईल, असा न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी ...

August 21, 2024 1:08 PM

खासगी उद्योगांची गुंतवणूक ५४ टक्क्यांनी वाढेल – आरबीआयचा अंदाज

चालू आर्थिक वर्षात देशात खासगी उद्योगांची गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४ टक्क्यांनी वाढेल, असा भारतीय रिझर्व बँकेचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ही गुंतवणूक एक लाख एकोणसाठ हजार दोनशे एकवीस कोटी होती, ती यंदा दोन लाख पंचेचाळीस हजार दोनशे बारा कोटीपर्यंत जाण्याची शक्यता रिझर्व बँकेच्या वार्षिक अहवालात...

August 21, 2024 1:09 PM

EPFOमध्ये यावर्षी १९ लाख २९ हजार नवीन सदस्यांची नोंदणी

EPFO, अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत या वर्षी जूनमध्ये 19 लाख 29 हजार नवीन सदस्यांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत सदस्यसंख्येत 7 पूर्णांक 86 शतांश टक्क्यांनी वाढ झाली  आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयान आज एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. यात 18 ते 25 वयोगटातल...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.