राष्ट्रीय

September 13, 2024 3:30 PM

पंजाब : भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान समर्थक हल्ल्याच्या चौकशीप्रकरणी NIA ची कारवाई

कॅनडातल्या भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज पंजाबमधल्या मोगा, अमृतसर, गुरदासपूर आणि जालंधरमध्ये तपासणी केली. गेल्या वर्षी, संस्थेनं ओटावा इथल्या भारतीय दुतावासाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी केलेल्या निषेधाबद्दल गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यामागे...

September 13, 2024 6:35 PM

उद्यापासून नवी दिल्लीत चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला आरंभ

चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उद्यापासून आरंभ होत असून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित या हीरक महोत्सवी विशेष सोहळ्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एक विशेष टपाल तिकिट आणि नाणं प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत अ...

September 13, 2024 3:04 PM

पश्चिम बंगालमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ईडीचे छापे

अन्न पुरवठा आणि वितरण भ्रष्टाचार प्रकरणी ईडी, अर्थात सक्तवसुली  संचालनालयानं आज पश्चिम बंगालमध्ये पश्चिम मेदिनीपूर, दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, नादिया आणि कोलकाता यासह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. विविध गोदामं, रास्त भाव दुकाने आणि रेशन विक्रेत्यांच्या घरांची तपासणी सुरू आहे.

September 13, 2024 3:00 PM

अल्जीरियात भारताचे राजदूत म्हणून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांची नेमणूक

अल्जीरियात भारताचे राजदूत म्हणून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ स्वाती विजय कुलकर्णी यांची नेमणूक झाली आहे. त्या परराष्ट्र सेवेच्या १९९५ च्या तुकडीतल्या अधिकारी असून सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.

September 13, 2024 2:32 PM

किरकोळ चलनफुगवट्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ

देशाच्या किरकोळ चलनफुगवट्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ झाली आहे. यंदा जुलैमध्ये तीन पूर्णांक सहा दशांश टक्के असलेला हा दर ऑगस्टमधे तीन पूर्णांक ६५ शतांश  टक्के झाला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली.  गेल्या पाच वर्षातला हा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्...

September 13, 2024 1:20 PM

अ‍ॅमेझाॅन आणि फ्लिपकार्ट गैर स्पर्धात्मक पद्धतींचा अवलंब करत असल्याचे आढळले

अ‍ॅमेझाॅन आणि फ्लिपकार्ट या ई काॅमर्स कंपन्या काही निवडक कंपन्यांना पसंती देऊन गैर स्पर्धात्मक पद्धतींचा अवलंब करत असल्याचं भारतीय स्पर्धा आयोगाच्या निदर्शनाला आलं आहे. आयोगानं एका अहवालात या तपासाबद्दल माहिती दिली आहे. या दोन्ही कंपन्यांनी काही निवडक कंपन्यांनाच उच्च मानांकन दिलं असून ग्राहक एखादी ...

September 13, 2024 1:22 PM

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना दिलं जाणार नवीन कार्ड

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व जेष्ठ नागरिकांना एक नवीन विशेष कार्ड दिलं जाणार आहे. आधार कार्डावरच्या जन्मतारखेनुसार ७० वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक या योजनेत अर्ज दाखल करण्यास पात्र असतील. ही योजना एका आठवड्यात सुरु होईल अशी अपेक्षा असून यासाठी पात्र व्...

September 13, 2024 3:06 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. ईडी अर्थात सक्त वसुली संचलनालयाच्या प्रकरणात त्यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. ईडीनं त्यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सीबीआयनं...

September 13, 2024 1:16 PM

नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तत्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती

नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तत्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे. रशिया मध्ये सेंट पीटर्सबर्ग इथं झालेल्या एका बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि  चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य आणि ...

September 13, 2024 12:38 PM

जम्मू आणि काश्मीर : पूंछमध्ये एका दहशतवाद्याला स्फोटकं आणि दारूगोळ्यांसह अटक

जम्मू आणि काश्मीरमध्ये, पूंछ जिल्ह्यात सुरनकोटच्या पोथा बायपास इथं सुरक्षा दलांनी काल संध्याकाळी जम्मू आणि काश्मीर गझनवी फोर्स संघटनेच्या एका दहशतवाद्याला स्फोटकं आणि दारूगोळ्यांसह अटक केली. प्राथमिक तपासात त्याची ओळख दर्याला नौशेरा इथला रहिवासी मोहम्मद शाबीर अशी झाली आहे. तो पाकव्याप्त काश्मीर इथल्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.