राष्ट्रीय

September 16, 2024 1:42 PM

आठव्या भारत जल सप्ताह २०२४ ची सुरुवात उद्या नवी दिल्लीत होणार

आठव्या भारत जल सप्ताह २०२४ ची सुरुवात उद्या नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. चार दिवसांच्या या कार्यक्रमात ४० देशातले दोनशे प्रतिनिधी सहभागी होतील. या कार्यक्रमात शंभरहून अधिक दालनं आणि जलक्षेत्रातले स्टार्टअप्स आपल्या संकल्पना मांडती...

September 16, 2024 1:39 PM

आज जगभरात ओझोन आवरण दिन साजरा

आज जगभरात ओझोन आवरण दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी १६ सप्टेंबरला हा दिन साजरा केला जातो. सूर्याच्या घातक किरणांपासून पृथ्वीवरील वातावरणाचं संरक्षण करण्याचं कार्य हे ओझोनचं आवरण करत असतं.   सर्वसाधारण जीवनातल्या अनेक रसायनांच्या वापराने ओझोनचं आवरण पातळ होत असल्याचं आढळून आलं आहे. त्याच्या संवर...

September 16, 2024 1:33 PM

देशात अनेक ठिकाणी ईदएमिलाद चा उत्साह

देशात अनेक ठिकाणी आज ईद - ए - मिलाद - उन - नबी म्हणजेच प्रेषित मोहम्मद पैगंबरांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या ...

September 16, 2024 1:23 PM

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तिन्ही टप्प्यांची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.   जम्मू काश्मीर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान १८ सप्टेंबर रोजी होणार आहे....

September 16, 2024 10:04 AM

यागी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या देशांच्या मदतीसाठी भारताचं ऑपरेशन सद्भाव सुरू

  यागी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या देशांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन सद्भाव सुरू केले आहे. या अंतर्गत भारताने व्हिएतनामला 10 लाख डॉलरची मदत पाठवल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. काल एका विशेष विमानाने 35 टन साहित्याची मदत व्हिएतनामला रवाना करण्यात आली....

September 16, 2024 9:48 AM

स्टार्टअप्स परिसंस्थेला बळ देण्यासाठी भास्कर या नव्या डिजीटल मंचाची सुरुवात

देशातल्या स्टार्टअप परिसंस्थेला बळकट करण्याच्या उद्देशाने उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग म्हणजेच DPIIT कडून भास्कर नावाच्या डिजीटल मंचाची सुरुवात करण्यात येणार आहे. भारत स्टार्टअप नॉलेज अॅक्सेस रजिस्ट्री म्हणजेच भास्कर हा मंच उद्योजकीय परिसंस्थेतील प्रमुख भागधारकांमधलं सहकार्य केंद्रीकृत, ...

September 16, 2024 9:37 AM

सरकारी नोकऱ्यांच्या पलीकडे इतर रोजगारसंधींना गवसणी घाला- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून, भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीमध्ये जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल मुंबईत केल. राज्यातल्या 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण मुंबईच्या एल्फिन्स्टन महावि...

September 16, 2024 9:35 AM

विस्तारीत रेल्वे जाळ्यामुळे पूर्व भारतातल्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल- प्रधानमंत्री

पूर्व भारतातल्या विस्तारित रेल्वे जाळ्यामुळं संपूर्ण प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. झारखंड राज्याची राजधानी रांची इथं ते काल बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून काल साडेसहाशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विवि...

September 15, 2024 7:57 PM

केरळमधील मलप्पुरममध्ये तरुणाचा निपाह विषाणूने मृत्यू झाल्याचं स्पष्ट

केरळमधे मलप्पुरम जिल्ह्यात पेरिंतलमन्ना इथल्या खासगी रुग्णालयात मृत्यू झालेला तरुण निपाह विषाणूबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेनं त्याच्या शरीरातले नमूने तपासल्यानंतर, त्याचा मृत्यू निपाह विषाणूमुळे झाल्याचं स्पष्ट केलं आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पाव...

September 15, 2024 7:54 PM

छत्तीसगडमधे चेटूक करत असल्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातल्या ५ जणांची हत्या

छत्तीसगडमधे सुकमा जिल्ह्यात चेटूक करत असल्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातल्या पाच जणांची आज हत्या करण्यात आली. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. कोंटा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ईटकला गावात हा प्रकार घडल्याचं समजल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस पथक घटनास्थळी पोचलं. याप्रकरणी त्यांनी पाच जणांना अटक के...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.