राष्ट्रीय

September 17, 2024 10:10 AM

कर्मचारी निवड आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांकाचा उपयोग करण्यास केंद्र सरकारची संमती

कर्मचारी निवड आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांकाचा उपयोग करण्यास केंद्र सरकारनं संमती दर्शवली आहे. आयोगाच्या परीक्षा आणि प्रत्यक्ष भरतीच्या विविध स्तरांवरदेखील उमेदवाराची ओळख सिद्ध करण्यासाठी आधार क्रमांक वापरला जाणार असल्याचं यासंदर्भ...

September 17, 2024 10:01 AM

पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे, नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून लोकार्पण

राज्यातल्या तीन वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे आणि नागपूर सिकंदराबाद मार्गांवर या गाड्या धावतील. पुणे हुबळी वंदे भारत रेल्वेला नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दा...

September 16, 2024 8:08 PM

भारताला वर्ल्ड स्किल्स २०२४ स्पर्धेत १६ पदकं आणि मेडलिअन्स ऑफ एक्सलन्स पुरस्कार मिळाला

भारतानं फ्रान्स इथं झालेल्या वर्ल्ड स्किल्स २०२४ स्पर्धेत १६ पदकं आणि मेडलिअन्स ऑफ एक्सलन्स पुरस्कार मिळवले आहेत. बेकरी उत्पादनं आणि मिठाई उद्योग, हॉटेल रिसेप्शन आणि नवीकरणीय उर्जा या विभागाच्या चार कास्यपदकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त भारतीय पथकानं विविध व्यापार आणि विशेष कौशल्यांच्या विभागात उत्...

September 16, 2024 7:55 PM

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी स्थानिक प्रशासन सज्ज होत आहे. जम्मू काश्मीरमधे मुख्य निवडणूक अधिकारी पी. के. पोल यांनी मतदारांसाठी विशेष जागृती अभियान सुरु केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा स्वीप कार्यक्रम येत्या १८ सप्टेंबरपासून पूर्ण केंद्रशासित प्रदेशात राबवला जाणार आहे. या जागृ...

September 16, 2024 7:51 PM

कोलकात्याच्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

कोलकात्याच्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या सुनावणीत सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय पीठासमोर या प्रकरणाचा ताजा अहवाल सादर होणार आहे.  दरम्यान...

September 16, 2024 7:47 PM

मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रजिस्ट्रीचं (भास्कर) अनावरण

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं भास्कर अर्थात भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रजिस्ट्रीचं अनावरण केलं. स्टार्ट अप्स, गुंतवणूकदार, सेवा प्रदाते आणि नियंत्रक यांच्यात परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठई भास्कर उपयोगी पडणार आहे. स्टार्टअप उद्योगामध्ये भारताला जागतिक के...

September 16, 2024 6:53 PM

अहमदाबाद ते गांधीनगर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला प्रधानमंत्र्यांचा हिरवा झेंडा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद ते गांधीनगर या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला. तसंच अहमदाबाद ते भुज या वंदे भारत मेट्रोसह ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. अहमदाबाद ते भुज ही देशातली पहिली वंदे भारत मेट्रो आहे. सध्याचा काळ हा भारतासाठी सुवर्णकाळ असून पुढच्या...

September 16, 2024 8:03 PM

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकारनं गाडून टाकले – गृहमंत्री अमित शहा

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकारनं गाडून टाकले आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. किश्तवरमधल्या पड्डेर - नागसेनी मतदारसंघात सुनिल शर्मा यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहिरनाम्यात दहशतवाद्यां...

September 16, 2024 3:24 PM

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज – प्रधानमंत्री

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून याचाच भाग म्हणून सरकारनं २० हजार कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांच...

September 16, 2024 1:57 PM

देशभरात उद्यापासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात

  देशभरात उद्यापासून 'स्वच्छता ही सेवा' अभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहाणार आहे. 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे.   या अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान आणि सामूहिक कार्याच्या माध्यमातून पर्यटन ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.