राष्ट्रीय

September 17, 2024 2:44 PM

उत्तरप्रदेशातल्या फिरोजाबाद जिल्ह्यात एका फटाक्यांच्या गोदामात स्फोट

उत्तरप्रदेशातल्या फिरोजाबाद जिल्ह्यात एका फटाक्यांच्या गोदामात काल रात्री झालेल्या स्फोटात एका लहान मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटामुळे इमारत कोसळली तसंच याचा आवाज आजूबाजूच्या दोन किलोमीटर परिसरात ऐकू आला.  

September 17, 2024 2:11 PM

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताचा प्रियांशू राजावत पहिल्या फेरीत बाद

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताचा प्रियांशू राजावत आज पहिल्या फेरीत बाद झाला. प्रियांशूला कॅनडाच्या ब्रायन यांगने सरळ गेममध्ये पराभूत केलं. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात उद्या भारताच्या किरण जॉर्जचा सामना जपानच्या केंटा निशिमोटोशी होईल. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत भार...

September 17, 2024 2:09 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात ‘सुभद्रा’ योजनेचा प्रारंभ करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात भुवनेश्वर इथं ओदिशा राज्य सरकारच्या ‘सुभद्रा’ या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यभरातल्या २१ ते ६० वयोगटातल्या पात्र लाभार्थी महिलांना, पाच वर्षांत ५० हजाराचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. या अंतर्गत वर्षभरात दोन हप्त्यांमध्ये १० हजार र...

September 17, 2024 2:08 PM

मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमीत्त त्यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी संवाद साधला. मणिपूर...

September 17, 2024 4:29 PM

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात

देशभरात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२४’ ला सुरुवात झाली. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू असेल. स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता ही यंदाच्या अभियानाची संकल्पना आहे. यंदाच्या अभियानासाठी संपूर्ण समाजाचा सहभाग असावा या दृष्टीने श्रमदान मोहिमा, जन भागिदारी आणि सफाई मित्र हे तीन प्रमुख स्तंभ...

September 17, 2024 11:14 AM

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात शंभर दिवस पूर्ण

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात शंभर दिवस पूर्ण केले आहेत. मोदी सरकारच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांमध्ये लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम आणि निर्णय घेण्यात आले आहेत, आणि विकसीत Bharat@2047 यांचा भक्कम पायाभरणी केली आहे.  

September 17, 2024 11:04 AM

पश्चिम बंगाल सरकारनं आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

पश्चिम बंगाल सरकारनं आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य केल्या आहेत, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. काल रात्री कालीघाट इथल्या निवासस्थानी कनिष्ठ डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, डॉक्टरांची मागणी लक्षात घेऊन कोलकात्याचे पोलिस आ...

September 17, 2024 11:00 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरू होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून सुरू होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी देशवासियांना ई-लिलावात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या लिलावाद्वारे मिळणारा निधी नमामि गंगे योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. यावर्षी लिलावाचा सहावा हप्ता असून सुरु...

September 17, 2024 10:58 AM

नौदल कमांडर परिषदेची 2024 साठीची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्ली इथं सुरू

नौदल कमांडर परिषदेची 2024 साठीची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्ली इथं सुरू होत आहे. नौदल कमांडर्समधील महत्त्वाच्या सामरिक, आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणारी ही परिषद म्हणजे सर्वोच्च पातळीवरील द्विवार्षिक कार्यक्रम आहे. चार दिवसीय परिषदेचा प्रारंभ नौदलप्रमुखांच्या बीजभाषणानं होणार आहे. या पर...

September 17, 2024 10:53 AM

आठव्या भारत जल सप्ताह 2024ला नवी दिल्लीत प्रारंभ

आठव्या भारतीय जल सप्ताहाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत मंडपम इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 400 देशांतील दोनशे परदेशी प्रतिनिधींसह सुमारे चार हजार इतर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रदर्शनादरम्यान शंभराहू...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.