राष्ट्रीय

June 17, 2024 2:46 PM

मक्का इथं धार्मिक विधी सुरू असताना १४ भाविकांचा मृत्यू

मुस्लिम धर्मात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या हज यात्रेचा उद्या शेवटचा दिवस आहे.  हज यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी जवळपास १८ लाख नागरिक सौदी अरेबियाला येतात. यात्रेदरम्यान तापमानाचा त्रास कमी करण्यासाठी सौदी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात परंतू  वाढत्या तापमानाचा फटका  हज यात्रेकरुंनाही बसत आ...

June 17, 2024 12:37 PM

मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांची घेतली भेट

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी काल काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांची भेट घेतली. संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली.या अधिवेशनात सर्व पक्षांनी मिळून देशाच्या विकासासाठी काम करू असं प्रतिपादन उभय नेत्यांनी या भेटीत केलं...

June 17, 2024 12:22 PM

अग्निपथ योजना सैनिक सन्मान योजना म्हणून पुन्हा सुरू झाल्याच्या अफवांचे सरकारकडून खंडन

देशात सुरु असलेली अग्नीपथ ही योजना काही बदल करुन सैनिक समान योजना या नावानं पुन्हा सुरु केली जाणार असल्याचे समाजमाध्यमांवर फिरत असलेले संदेश निव्वळ अफवाच असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं कळवलं आहे. या संदेशात या योजनेत काही बदल करण्यात आल्याचं म्हटलं आहे तेही खोडसाळपणाचं असल्याचंही कार्यालयानं कळवलं ...

June 17, 2024 6:22 PM

पश्चिम बंगालमधल्या सिलिगुडीमध्ये रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या न्यु जलपायगुडी स्थानकाजवळ सियालदाहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त ठिकाणीचे बचाव कार्य पूर्ण झालं आहे. प्रथमदर्शनी मालगा...

June 17, 2024 11:15 AM

संसदेच्या आवारातील प्रेरणा स्थळाचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

संसदेच्या आवारात नव्यानं उभारण्यात आलेल्या प्रेरणा स्थळाचं उद्घाटन काल राज्यसभेचे अध्यक्ष, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झालं. संसदेला भेट देण्यासाठी आलेल्या अभ्यागतांना स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे आणि नेते यांचे पुतळे एकाच ठिकाणी पाहता यावेत अशा पद्धतीने या प्रेरणा स्थळाची रचना करण्यात आली ...

June 17, 2024 11:13 AM

भारत आणि कंबोडिया थेट विमानसेवा सुरू

  भारत आणि कंबोडिया यांच्यात कालपासून थेट विमानसेवा सुरू झाली. कंबोडियाचे उपपंतप्रधान नेथ सेवोउन आणि तिथल्या भारतीय राजदूत देवयानी खोब्रागडे यांच्या हस्ते काल या विमानसेवेचं अधिकृत उद्घाटन झालं. या विमानसेवेद्वारे पहिल्या पर्यटन वर्षाची सुरुवात झाली असून यामुळे पर्यटनाला तसंच नागरिकांचा परस्पर संवाद...

June 17, 2024 11:01 AM

आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाची जनजागृती मोहीम

देशातल्या आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केंद्रिय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ अर्थात सीबीआयसीनं विविध माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत अशा फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहण्यासाठी वर्तमानपत्रं, मोबाईल संदेश, इ-मेल्स आणि समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना सूचना देण्यात य...

June 17, 2024 10:48 AM

लवकरच स्वतःचं समुद्रतळ अभियान असलेला जगातला सहावा देश होण्यास भारत सज्ज – मंत्री डॉ. जितेंद्र सिंग

लवकरच स्वतःचं समुद्रतळ अभियान असलेला जगातला सहावा देश होण्यास भारत सज्ज आहे अशी माहिती भूविज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. भूविज्ञान मंत्रालयाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत एक बैठक झाली. या बैठकीत सिंग यांनी समु...

June 17, 2024 10:21 AM

नागरिकांना जलद न्याय देण्यासाठी १ जुलैपासून ३ नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार

नागरिकांना जलद, वेळेवर आणि त्रुटिमुक्त न्याय देण्यासाठी देशात येत्या १ जुलैपासून ३ नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार आहेत. देशातील परिस्थिति आणि बदलणाऱ्या कालानुरूप, कायद्यांमध्ये ही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं मत केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी काल कोलकाता इथं व्यक्त क...

June 16, 2024 8:45 PM

बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडमधल्या तुरळक भागात उष्णतेची तीव्र लाट

बिहार, झारखंड, ईशान्य मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड आणि उत्तराखंडमधल्या तुरळक भागात पुढील दोन दिवसांत उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या बहुतांश भागातही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि उत्तर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.