राष्ट्रीय

July 2, 2024 1:05 PM

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी

कथित मद्य घोटाळा प्रकरणी कारागृहात असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज न्यायमूर्ती नीना बन्सल क्रिष्णा यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. सीबीआयने आपल्याला अटक करण्यासाठी कोणताही नवा पुरावा सादर केला नाही असं केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आह...

July 2, 2024 10:20 AM

यूपीएससी : नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४चे निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ चे निकाल काल जाहीर केले. जे उमेदवार पात्र ठरले आहेत त्यांना मुख्य परीक्षेसाठी पुन्हा एकदा तपशीलवार अर्ज करावे लागणार आहेत. आयोगाच्या वेबसाइटवर याबाबतचे तपशील आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.

July 2, 2024 8:34 AM

नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेला गती मिळेल – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

देशभरात कालपासून लागू झालेल्या सुधारित फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं असून, न्यायप्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायपालिका तसंच पोलिस प्रशासन...

July 2, 2024 10:11 AM

राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेत सुधारणांसाठी सूचना आणि प्रतिक्रिया पाठवण्याचं विद्यार्थी-पालकांना आवाहन

राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेत सुधारणांसाठी सरकारनं विद्यार्थी आणि पालकांकडून सूचना आणि प्रतिक्रिया मागवल्या आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं समाजमाध्यमांवरच्या संदेशात याबाबत माहिती दिली आहे. डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली आहे. या महिन्याच्या सात तारखेपर्यंत परीक्षेच्...

July 1, 2024 8:10 PM

कौटुंबिक  निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारीचं प्रभावी निवारण करणाऱ्या मोहिमेचा प्रारंभ

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत, कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारीचं प्रभावी निवारण करणाऱ्या मोहिमेचा प्रारंभ केला. कौटुंबिक निवृत्तीवेतन योजनेत करण्यात आलेल्या नव्या सुधारणा महिलांसाठी फायदेशीर ठरतील, असं जितेंद्र सिंह यांनी यावेळी सा...

July 1, 2024 8:05 PM

राज्यातल्या विधानपरिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर

राज्यातल्या विधानपरिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. या उमेदवारांच्या नावावर भाजपाच्या केंद्रिय निवडणूक समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सा...

July 1, 2024 8:07 PM

लोकसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ

लोकसभेच्या आजच्या कामकाजात आभार प्रस्तावावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्यावरुन गदारोळ झाला. त्यांच्या विधानावर प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि लोकसभा सभापतींनी आक्षेप घेतला.  राहुल गांधी हिंदू धर्मीयांना सरसकटपणे हिंसक म्हणत असल्याचं सांगत, हे गंभीर असल्...

July 1, 2024 7:02 PM

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना पाच महिन्यांचा कारावास

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीतल्या न्यायालयाने वीस वर्षांपूर्वी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी पाच महिन्यांचा कारावास ठोठावला आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी हा खटला दाखल केला होता. मेधा पाटकर यांनी आपल्याबद्दल प्रसिद्दीपत्रकाद्वारे अपमानजनक मजकूर...

July 1, 2024 3:49 PM

विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलेंडर ३० रुपयांनी कमी

भारतीय तेल कंपन्यांनी विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलेंडर ३० रुपयांनी कमी केले आहेत. नवीन दर आजपासूनच लागू झाले असून, सुधारित दरांनुसार १९ किलोग्रॅमचा सिलेंडर दिल्लीत १ हजार ६४६ रुपयांना तर मुंबईत १ हजार ५९८ रुपयांना मिळतील. गेल्या महिन्यातही सिलेंडरच्या दरात ६९ रुपये ५० पैसे घट करण्या...

July 1, 2024 3:42 PM

नीट फेरपरीक्षेचे निकाल जाहीर

राष्ट्रीय चाचणी संस्थेने आज नीटच्या फेरपरीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. ५ मे रोजी झालेल्या परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या १ हजार ५६३ विद्यार्थ्यांची फेर परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आली. एकूण ८१३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. निकाल एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. &nbs...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.